बातमी
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत विज योजनेकडे नागरिकांचा वाढला कल…
जिल्ह्यातील 2650 ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ...

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत विज योजनेकडे नागरिकांचा वाढला कल…
जिल्ह्यातील 2650 ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ…
विज बिल शून्य करण्याच्या अनुषंगाने सरकारकडून प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना आणण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना सोलर पॅनल लावण्यासाठी 50 टक्के सबसिडी देण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांचे वीज बिल शून्य होऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पादित केलेली शिल्लकची वीज महावितरणला विकता येणार आहे, या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांचा वाढता कल पहायला मिळतोय.. जिल्ह्यात आतापर्यंत 2650 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.. इतर ग्राहकांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कडून करण्यात येत आहे.



