बातमी

प्रवाशांच्या मनात एसटी विषयी सुरक्षित, प्रवासाची भावना निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने काम करावे- विभाग नियंत्रक सौ.शुभांगी शिरसाट

प्रवाशांच्या मनात एसटी विषयी सुरक्षित, प्रवासाची भावना निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने काम करावे- विभाग नियंत्रक सौ.शुभांगी शिरसाट


बुलडाणा,( प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारात सुरक्षितता मोहिमेचा उदघाटन समारंभ आज ११ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानावरून उद्घाटक प्रसंगी कामगारांना संबोधित करताना बुलडाणा विभाग परिवहन महामंडळाच्या कर्तृव्यदक्ष शिस्तप्रिय विभाग नियंत्रक सौ. शुभांगीताई सिरसाट यांनी
बुलडाणा आगारात आयोजित केलेल्या सुरक्षीतता मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी कर्मचाऱ्यांना संबोधित करीत असतांना म्हणाल्या की, प्रवासी आपले दैवत आहे, प्रवासी सेवा हीच इश्वर सेवा, प्रवाशाच्या सेवेसाठी, एसटीचा प्रवास सुरक्षीत प्रवास कसा आहे हे प्रवाशांच्या मनात एसटी विषयी सुरक्षीततेची भावना निर्माण करून प्रवासी एसटी कडे कसा आकर्षीत होईल व त्यांच्या मनात एसटी विषयी आपूलकीची व सुरक्षीततेची भावना निर्माण कसी होईल असे जर प्रत्येक एसटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वागले तर आपण एसटीला वैभवाचे दिवस आणू शकतो व आपणही वैभवात राहू शकतो म्हणून प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी हा आपला केंद्रबिंदू म्हणून वागावे असे विचार सुरक्षीतता मोहीमेच्या उद्धघाटन प्रसंगी काढले. विभाग नियंत्रक सौ.शुभांगी सिरसाठ यांनी एसटी महामंडळाच्या बसेसचा आपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व एसटी कर्मचारी अधिकारी उपस्थीतांना आवाहन करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्या विषयी आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या पंधरवाडा मोहीमेत विविध कार्यक्रम आयोजीत केले जाणार असून एसटी कामगारांची वैद्यकीय तपासणी शिबीरे सुध्दा घेण्यात येणार असून सुरक्षीततेची भावना वाढवण्यावर भर दिल्या जाणार आहे.
मुख्य अतिथी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नागनाथ महाजन,पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक ,विभागीय कार्यशाळा चे सहा.यंत्र अभियंता संतोष वानेरे,
बुलडाणा आगार प्रमुख अमोल गडलिंग,स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार, वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर , कार्यशाळा प्रभारक राजेश आराख, आगार लेखकार आरती लहासे
प्रामुख्याने उपस्थित होते.
बुलडाणा आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी आयोजित केलेल्या
सदर सुरक्षितता मोहिमेच्या
रस्ते प्रवाशी वाहतुकीत एसटी महामंडळचे अमूल्य योगदान असून एसटीचा कामगार हा सर्वाधिक नियमांचे पालन करणारे आहेत व करीत आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसी प्रेमाणे, आपुलकीने एसटी ही आपली माता आहे, ही अन्नदाता आहे असे वागावे प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करावे प्रवासी आपल्याकडे कसे आकृष्ट होतील यावर केंद्रीत झाले पाहीजे एसटीची भरभराट म्हणजे आपली भरभराट आहे असे भावनिक गौरव उद्दगार परिवहन कार्यालयाचे नागनाथ महाजन यांनी काढले .
नियमबाह्य अवैध प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून एसटीच्या बसेस सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याने सामाजीक बांधिलकी म्हणून पोलीस खात्याची एसटीसी नाते सामाजिक बांधिलकीचे आहे असे मनोगत व्यक्त करीत एसटी कामगारांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी राजेश रायकवार , कास्ट्राईबचे भारत आराख, रवि अवसरमोल, जितेंद्र साळवे, कल्पना खरात , निकिता खरात,माधुरी मिसाळ, ज्योत्स्ना आराख, मिरा उमाळे,राजेश आगाशे ,कामगार सेनेचे संजय उबरहंडे, शिला जाधव,दीपक मिसळकर ,एस.बी.सिरसाट, संदीप पवार,सचिन खिर्डेकर गजानन जुंबड ,सुरेश वखरे,अरुण राठोड, शेख मुश्ताक ,नारखेडे सतीश केलोदे, सुनील शेळके,
जितेंद्र साळवे ,प्रवीण बुंदे, अरविंद लांडगे,विनोद वाहुळे
यांनी परिश्रम घेतले यावेळी विविध संघटना प्रतिनिधी आणि बहुसंख्य एसटी कामगार उपस्थित होते .
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कामगार संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र पवार यांनी केले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक वाहक यांचा सत्कार घेण्यात आला.
एकूणच रस्ते वाहतुकीत एसटी महामंडळाच्या योगदानाची आणि सुरक्षितता मनामनात रुजविण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button