बातमी

प्रहार’ च्या रक्तदान महायज्ञात उसळली रक्तदात्यांची गर्दी तीन तासांत ५३ रक्तदात्यांचे रक्तदान; वेळअभावी रक्तदात्यांना परतावे लागले माघारी

धाड : गेल्या १८ वर्षांपासून ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ माणून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ समजून ‘मागेल त्याला रक्त’ हा उपक्रम राबविणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ६ जुलै रोजी पार पडलेल्या रक्तदान महायज्ञात सालाबादाप्रमाणे यंदाही रक्तदात्याची गर्दी उसळी.

मिळालेल्या अवघ्या तीन तासांच्या वेळेत या शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर अनेक रक्तदात्यांना वेळअभावी रक्तदान न करता माघारी फिरावे लागले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष, माजी मंत्री आ. बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून धाड परिसरात विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात. रुग्ण सेवेचं ब्रिद अंगीकारत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोफत रोगनिदान, मोफत शस्त्रक्रीया शिबिरातून कॅन्सर, किडणी, हार्ट, ब्रेन सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ७०० वर रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करुन त्यांना जिवदान देण्यात आले आहेत. तर आजवर शेकडो रक्तदान शिबिर आयोजित करुन हजारो रक्तदान निर्माण केले आहे. गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी ५ जुलै रोजी प्रहारच्या वतीने धाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सालाबादाप्रमाणे यंदा ६ जुलै रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या रक्तदानाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सागर पाटील गुजर, संतोष उबाळे, अनंत उबाळे, आकाश सिरसाठ, नितीन पवार, धिरज सरोदे, हेमंत उबाळे, नाना गुजर, प्रविण गुजर, राजू भिंगारे यांची उपस्थिती होती.
अवघ्या तीन तासांच्या या शिबिरात गणेश जाधव, वैभव माळोदे, गणेश गवळी, प्रविण गुंजाळ, सुरेश बामदाळे, प्रतिक गुंजाळ, अरविंद गुजर, गोपाल चिंचोले, अभिषेक गुजर, श्रीकांत गुजर, सुनिल उगले, अजय शिंदे, आशिष उबाळे, राजेंद्र उगले, कुंदन कुटे, सुनिल वाघ, यशवंत जाधव, नागेश टेहरके, विकी सरोदे, विलास ठाकरे, सुजय जाधव, योगेश बावस्कर, श्याम जगताप, सचिन नेमाने, प्रदीप दळवी, सोणू वाघ, मनोज ब्राम्हणे, आशिष तोटे, विशाल मोरे, अक्षय गुजर, सै. मोहंमद, राजू ढोके, अविराज परमेश्वर, रामेश्वर ताठे, मधुकर ताठे, गोपाल परमेश्वर, गणेश ताठे, राहुल येंडोले, मोहंमद नसीम मोहंमद अलीम, सौरभ ठाकरे, शुभम कुटे, अजय परदेशी, अमोल माळोदे, साहेबराव ताठे, कौतीकराव ताठे, दिलीप उबाळे, विष्णु घाडगे, सतिष ब्राम्हणे, विशाल ताठे, संजय अपार, राहूल लोखंडे, सुभाष मोहिते यांनी रक्तदान केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button