बातमी
प्रा. पुरुषोत्तम किलबिले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

प्रा. पुरुषोत्तम किलबिले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बुलढाणा (प्रतिनिधी ) गेली सतरा वर्ष शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदान करत असताना आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिजामाता हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दुधा येथील प्रा. पुरुषोत्तम किलबिले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 12 जानेवारी रोजी धाराशिव येथील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.



