प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रिडींग संघटनेने उपसले आंदोलनाचे हत्यार…
विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दिले जोरदार निदर्शने अभियंता यांना दिले निवेदन...

प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रिडींग संघटनेने उपसले आंदोलनाचे हत्यार…
एमएसईबी कार्यालयासमोर दिले जोरदार निदर्शने अभियंता यांना दिले निवेदन…
बुलढाणा 23 (आदर्श नेतृत्व ) प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रिडींग संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कार्यालयासमोर निदर्शने करत अभियंता याना स्मार्ट मीटर लावणे बंद करा या आशियाचे निवेदन देण्यात आले.
आज पर्यंत सामान्य वीज ग्राहक आपलं दरमहा वीज बिल भरून वीज वापरत आहे घरातील विजेसाठी वीजपुरवठा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे सध्या शासनाने राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत महाराष्ट्रासह पूर्ण देशात स्मार्ट मीटर्स बसवण्यात सुरुवात केली असून मोठमोठ्या कंत्राट दारास सुमारे अडीच कोटी मीटर्स बसवण्यासाठी अनुदान देऊ केले आहेत या मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोक्याचा मात्र ताप वाढणार आहे
प्रीपेड मीटर म्हणजे जेवढ्या रुपयाचा तुमचा रिचार्ज केला असेल तेवढीच वीज तुम्हाला वापरायला मिळणार आहे
रिचार्ज संपल्यावर तुमच्याकडे तात्काळ पैशाची उपलब्धता नसेल तर तुम्हाला अंधारातच राहावं लागेल…
त्याचबरोबर मीटर रीडर कर्मचाऱ्यांचे भविष्य देखील अंधारात जाणार आहे कारण स्मार्ट मीटर हे प्रीपेड असल्याने रीडिंग घेण्यासाठी लागणारी कर्मचारी हे कमी केल्या जाणार आहे त्यामुळे राज्यातील जवळपास 45 हजाराहून अधिक कर्मचारी यांच्या परिवाराचे भविष्य अंधारात ढकलले जाणार आहे
मीटर रीडर संघटनेच्या वतीने नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात अभियंता यांच्याकडे निवेदन दिले असून कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देखील केले आहे
संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असलेल्या 45 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भविष्याच काय असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांनी मागील 15 ते 20 वर्षापासून रेडींग चे काम केले आहे व याशिवाय त्यांच्याकडे दुसरा उदरनिर्वाहाचे साधन नसून काम बंद झाले तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल व उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे
केंद्र सरकार राज्य सरकार आणि महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सध्या चालू आहे गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मध्ये जाहीर केले होते की सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत परंतु आज सध्या फॉल्टीमीटर बसवण्याच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने चालू आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आम्ही आपल्या कंपनीचा एक अविभाज्य घटक असून आम्हाला न्याय देण्यात यावा व लवकरात लवकर हे स्मार्ट मीटर लावण्याचे काम बंद करण्यात यावे व तीस एक 2025 पर्यंत निर्णय न मिळाल्यास येत्या एक फेब्रुवारी 2025 पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील निवेदनात करण्यात आला आहे.



