फुले शाहू आंबेडकर महिला बहूउदेशिय शिक्षण संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
गरजूंना संस्थेच्या वतीने कपडे वाटप...

फुले शाहू आंबेडकर महिला बहूउदेशिय शिक्षण संस्था शेगाव यांच्या वतीने लोकनेते रामदास आठवले वृद्धाश्रम शेगाव येथे त्यागमुर्ती रमाई जयंतीनिमित्त संस्था च्या अध्यक्ष मा.संगिता मोहोड मॅडम यांनी वूध्दानां कपडे लुगडं व धोतर व पयजामा यांच्या वाटप करण्यात व नास्ता सुद्धा देण्यातआला आहे. वूध्दाशी सवांद साधत असताना अनेक समस्या नी ग्रास्त असलेले वृद्ध आहे त्या वृद्धाश्रमामध्ये आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपले मुल म्हणतो ना आपण जन्मदात्या आई-वडिलानी आपल्याला जन्माला घातले लहानाचं मोठं केलं त्यांचे लाड पुरवणे त्यांना शिक्षण दिले आता तेच मुले मोठे होऊन लग्न झाल्यावर आपले आई-वडिल त्यांना नकोशे वाटतात त्यांना आई वडील आपल्या जीवावर पडल्यासारखे वाटतात म्हणून तीच मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये दाखल करतात आपलेच मुलं आपल्याला बेईमान होताना दिसत आहे. त्या त्या वृद्धाश्रमामध्ये वृद्ध वेगवेगळ्या कारणामुळे वृद्धाश्रमामध्ये आलेले आहे कुणाचे चारपाच मुलं असताना सुद्धा ते आई वडीलांना सांभाळू शकत नाही कुणाचे मुलं दारू पितात त्यामुळे ते आई वडिल ना पोहोचू शकत नाही कुणाचे कुटुंबातील वाद झाल्यामुळे ते मुलं सांभाळू शकत नाही कुटुंबिक समस्या असल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमा मध्ये राहावं लागत सरकारने वृद्धाश्रम काढून वृद्धांना खूप मोठा सहारा दिलेला आहे ते वृद्ध तिथे खुश आहे निवांत आहे.



