बातमी

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात फळ, शैक्षणिक साहित्याचे वाटप 

शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचे आयोजन

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात फळ, शैक्षणिक साहित्याचे वाटप 

* शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचे आयोजन 
बुलडाणा : आदर्श नेतृत्व
        हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. 
 
        बुलडाणा व खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, चिखली, मेहकर, मलकापूर, शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय तर धाड, उदयनगर, देऊळगाव मही, पिंपळगाव काळे, जानेफळ, साखरखेर्डा, सुलतानपूर, बीबी, धामणगाव बढे, सोनाळा, वरवट बकाल, अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यासह पळसखेड सपकाळ येथील सेवासंकल्प प्रतिष्ठान, मूकबधिर विद्यालय, बुलडाणा येथे फळवाटप केले जाणार आहे. मोताळा तालुक्यातील चावरदा येथील कुष्ठरोग धाममध्ये भोजनदान करण्यात येणार आहे. 
 
तसेच माळविहिर, शिरपूर, सावळा, पोखरी, भादोला, पिंपरखेड, वरवंड, डोंगरखंडाळा, सव, रुईखेड टेकाळे, खेर्डी, येळगाव, नांद्राकोळी, अजीसपूर, साखळी येथील जिल्हा परिषद शाळा आणि बुलढाणा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button