बातमी

बिबट्याने घेतला शेतकऱ्याच्या नरडीचा घोट…

36 वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ल्यात जागीच मृत्यू

जनावरे जर गावात घुसून शिकार करत असतील तर आम्हाला सुद्धा यांची शिकार करावी लागेल ..आ संजय गायकवाड

 

बुलढाणा
गोंधण खेड शिवारात शेती राखण्यासाठी गेलेल्या 36 वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्या ची घटना दुपारी घडली आहे.

गिरड येथील रहिवाशी नामे सुनील सुभाष जाधव वय वर्ष 36 ही व्यक्ती आपल्या शेतात शेत राखण्यासाठी जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला 50 मीटर खोल दरीत घेऊन गेला व त्या बिबट्याने शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे आणला या घटनेची माहिती बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात जाऊन शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याची पाहणी केली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेचा पंचनामा करून तात्काळ मृतदेह शेतकऱ्यांच्या परिवारास सुपूर्त करण्यासंदर्भात निर्णय दिले
मृत्यूनंतर परिवारात दोन भाऊ एक मुलगी पत्नी आई वडील असा आप्तपरिवार आहे

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे

गवस मैडम भारतीय वन सेवा अधिकारी

वनपाल मोशीन खान बुलढाणा
व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

————

वनविभागाने वनपरिक्षेत्राला तार कंपाऊंड करून शेतकऱ्यांच्या जीवाचे रक्षण करावे अन्यथा ही जनावरे जर गावात घुसून शिकार करत असतील तर आम्हाला सुद्धा यांची शिकार करावी लागेल याशिवाय मनुष्य जातीला वाचवण्यासाठी दुसरा पर्याय नाही… आमदार संजय गायकवाड

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button