राजकीय बातमी

बुलडाणाला जिल्हयातीलच मंत्री पालकमंत्री म्हणून द्यावा आ. संजय गायकवाड यांची मुख्यमंत्री फडणवीसकडे मागणी

बुलडाणाला जिल्हयातीलच मंत्री पालकमंत्री म्हणून द्यावा
आ. संजय गायकवाड यांची मुख्यमंत्री फडणवीसकडे मागणी
बुलडाणा,
जिल्हयाचा विकास व्हावा या अनुशंगाने जिल्हयातीलच मंत्रीला पालकमंत्री म्हणून संधी द्यावी अशी मागणी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १५ डिसेंबर रोजी केली. या संदर्भात त्यांनी पत्र देखील दिले.
राज्यातील अनेक नवनिर्वाचित आमदारांचा १५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडला. लवकरच या आमदारांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात देणार आहे. यात खामगावचे भाजपाचे आमदार आकाश फुंडकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सदर शपथविधी नागपूर येथे पार पडला. यावेळी शिवसेनेचे आ. संजय गायकवाड हे देखील या सोहळयात उपस्थित होते. सोहळयानंतर आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बुलडाणा जिल्हयाला विकासासाठी स्थानीय मंत्रीलाच पालकमंत्री म्हणून संधी द्यावी अशी मागणी करत आ. आकाश फुंडकर यांच्या नावाला पसंती देण्याची मागणी केली. आ. फुंडकर यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूकीत विजय मिळवला आहे. त्यांना जिल्हयातील सर्वच घडामोडी, अडचणी, समस्यांची जाण आहे. जिल्हयातील समस्यांना ते चांगल्या प्रकारे न्याय देवू शकतात. बाहेर जिल्हयातील मंत्रयास संधी दिल्यास ते केवळ ध्वजारोहणाप्रसंगीच उपस्थित राहतात, जिल्हयाच्या विकासाचे गांभीर्य त्यांना नसल्याचे आज पर्यत पाहण्यात आले आहे. स्थानीय मंत्रीस जिल्हयाच्या समस्या बाबत त्यांना वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. तसेच स्थानीय जिल्हयातील असल्याने जिल्हयाच्या विकासाची जवाबदारी देखील त्यांच्यावर अधिक असते. करीता भाजपाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनाच जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून संधी देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी या मागणीत केली आहे.

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button