बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची जिल्हा बैठक देऊळगावराजा राजा येथे दिनांक १ डिसें २०२४ रोजी बैठकीचे आयोजन

बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची जिल्हा बैठक देऊळगावराजा राजा येथे दिनांक १ डिसेंबर २०२४ रोज रविवारला न्यु बालाजी हॅाटेल जालना रोड शिंदे हाऊसपीटल जवळ देऊळगाव राजा येथे होणार आहे.
रिपाईचे राष्ट्रीय आध्यक्ष सामाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार दिनदुबळ्यांचे ह्रदयसम्राट आदर्णिय डॅा.रामदाजी आठवले साहेब यांच्या दुरध्वनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ वेळ सकाळी सात वाजून २९ मिनिटाच्या आदेशावरून रिपाई महाराष्ट्राचे संघटक आदर्णिय सुधाकर दादा तायडे यांना बुलडाणा जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून पाठवीत आहे. त्या आदेशाचे पालन करून दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी देऊळगाव राजा येथे माननिय सुधाकर दादा तायडे यांचे आध्यक्षतेखाली बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभेत महायुतीला विजयी करण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका कसी राहीली याचा आढावा घेण्यात येईल. लोकसभेत व विधान सभेत आपल्या पक्षाला एकही जागा दिली नाही त्यामुळे सर्व कार्यकरते नाराज होते पण मा. आठवले साहेबांचा आदेश आला व नाराजी दुरकरून महायुतीचे काम केले व लोकसभेत व विधान सभेत विजय मिळून दिला. बुलडाणा विधान सभेत सात मतदार संघा पैकी सहा विधानसभा मतदार संघ महायुतीला विजय मिळून दिले यात रिपाई आठवलेंच्या कार्यकर्यकरत्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. म्हणून महायुतीकडे व राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांकडे मागणी करावयाची आहे की, विधान सभेत व लोकसभेत आपल्या पक्षाला महायुतीने एकही जागा दिली नाही पण आता पूढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यसंथा, जिल्हापरिषदा, नगरपालिकेत, शासकीय समित्यावर महायुती कडून आपल्या कार्यकरतेयांना समजावून घेण्यात यावे असी मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात रिपाई पक्ष वाढवीण्यासाठी काय काय उपाय करावे लागेल यावरही विचार विनिमय होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधान सभेच्या निवडणूकीच्या वेळेस आपले आदर्णिय जिल्हाध्यक्ष नरहरी दादा गवई यांनी रिपाई जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रीय नेते डॅा. रामदासजी आठवले यांच्या आदेश व पक्षाच्या विरोधात पत्रकार परिषद घेवून कॅांग्रेसला राहूल बोंद्रे महाविकास आघाडी ला पाठीबा देत आहे असे पत्रकार परिषद घेवून पक्षाचा व पदाचा राजीनामा दिला आहे असे जाहीर केले व राष्ट्रीय आध्यक्ष माननिय आठवले साहेब व रिपाईचे प्रदेशध्यक्ष माननिय राजाभाऊ दादा सरोदे यांना राजीनामा पाठविला होता. हे कृत्य पक्ष विरोधी असल्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला व विधान सभा निवडनूक काळात जिल्हा कार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव यांचे कडे विधान सभेच्या निवडनुका व नविनअध्यक्ष होईपर्यंत प्रभारी म्हणून दुरध्वनीवरून राज्यसरचिटणीस आदर्निय गौतम दादा सोनावणे यांनी पदभार दिला होता. आता विधान सभेच्या निवडणूका झाल्या आहे व आता आपल्याला नविन जिल्हाध्यक्ष निवडावयाचा आहे त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या सहमतातून,चर्चेतून व विचार विनिमय करून निवडावयाचा आहे.
तरी या महत्वपूर्ण बैठकीस बुलडाणा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले पक्षाच्या कार्यकरत्यांनी उपस्थीत राहावे असे आव्हाण जिल्हा प्रभारी तथा मा.जिल्हाकार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
जालना रोड शिंदे हॅास्पीटल नु बालाजी हॅाटेल देऊळगाव राजा



