बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाच्या वतीने पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा भावपूर्ण सत्कार

बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाच्या वतीने पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा भावपूर्ण सत्कार

बुलडाणा, (प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने नवनियुक्त बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांचा बुलडाणा जिल्हा रिपाईचे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधीकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला व त्यांना पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नंतर रिपाई शिष्टमंडळाने नामदार पालक मंत्री महोदया सोबत चर्चा करण्यात आली की, रिपाई आठवले गट हा महाराष्ट्राच्या महायुती सरकार सोबत आहे, आमच्या मित्र पक्षाला बुलडाणा जिल्ह्यातील ज्या ज्या शासकीय कमेट्या असतील त्या त्या शासकीय कमेट्यानवर मित्र पक्ष यानात्याने आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सामावेश करून शासकीय समित्यांवर घ्यावे ही विनंती करण्यात आली. आम्ही आपल्या महायुतीत नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे आदेशाने आम्ही तूमच्या सोबत आहोत व राहू, फक्त आम्हाला मित्र पक्ष या नात्याने महायुतीच्या शासनामध्ये सन्मानाची वागणूक द्यावी. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी घाटावरिल रिपाई जिल्हाध्यक्ष इंजिनियर खरात, घाटाखालील जिल्हध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हाउपाध्यक्ष इंजिनियर राजेश सरकटे, अल्पसंख्यचे जिल्हध्यक्ष नबाब मिर्झा, रिपाई जेष्ठनेते मुरलीधर गवई, युवाजिल्हाध्यक्ष विजय साबळे, बुलडाणा तालुखाध्यक्ष केशव सरकटे, मोताळा तालुखाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, विदर्भ महीलाउपाध्यक्ष आशाताई वानखडे, जिल्हा नेते विजयराव सपकाळ, चिखली हिम्मतराव जाधव, सिंदखेडराजा रमेश पिंपळे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल, जळगांव जामोद संतोषराव वानखडे, खामगाव निळकंठ सोनुने, नादुरा शैलेश वाकोडे, मलकापूर दिलीप इंगळे, शेगाव सुरज शेगोकार, सग्रामपुर बाबूलाल इंगळे, लोणार समाधान सरदार, बुलडाणा तालुखा महीलाध्यक्ष उषाताई इंगळे, युवाध्यक्ष घाटाखालील मंगेश मेढे, डॅा. बबन परमेश्वर, ग.ग. इंगळे,भास्करराव जाधव इत्यादी असंख्य पदाधिकारी रिपाई कार्यकर्ते उपस्थीत होते.



