बातमी

बुलडाणा रोडवरील खोटरा नाला पुलाचे बांधकाम रखडले

*बुलडाणा रोडवरील खोटरा नाला पुलाचे बांधकाम रखडले* जगप्रसिद्ध सैलानी बाबा दर्ग्या कडे जाणाच्या बुलडाणा ते सैलानी रोड वर नागमोडी उताराचे रस्त्यावर रायपुर नजीक खोटऱ्याचा नाला नावाने ओळाखले जाणाऱ्या नाल्या वरील पुलाचे काम थंड बस्यात पडले असल्या मुळे या रस्त्यावरील सैलानी दर्ग्या कडे जाणार्‍या वाहतूकीस खोळंबा निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असून सदर नाल्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भला मोठा खड्डा दृष्टीपथास पडत आहे. विशेष गंभीर व चिंताजनक बाब अशी की सदर ठिकाणी वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक ठळक पणे दिसत नसल्या मुळे उतारावरून येणारे वाहन सरळ खड्यात कोसळण्याची शक्यता आहे. तसेच जाणाऱ्या येणाऱ्या वाहनास अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पुलाचे बांधकामास गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी विवीध स्थरातून होत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button