*बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा दमदार विस्तार*
आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी एबीपी माझाचे डॉक्टर संजय महाजन ◾ सचिव पदी आदेश कांडेलकर

*बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा दमदार विस्तार*
◾आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी एबीपी माझाचे डॉक्टर संजय महाजन
◾ सचिव पदी आदेश कांडेलकर
बुलढाणा, 8 जानेवारी (प्रतिनिधी) ः पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा विस्तार तीव्र गतीने सुरू असून आज संध्याकाळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या आरोग्य सेलच्या दोन महत्त्वपूर्ण पदांची घोषणा करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने डॉक्टर संजय महाजन यांची आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली असून सचिव पदाची जबाबदारी आदेश कांडेलकर यांच्याकडे देण्यात आली आहे. समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतो. आपल्या पत्रकार बांधवांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांना आरोग्य संबंधी भेटणारे प्रश्न योग्य मार्गदर्शन आणि उपचारातून सोडवले जावे, या प्रामाणिक हेतूने आरोग्य सेल काम करतो. त्यामुळे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या आरोग्य सेलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा आरोग्य सेलचे अध्यक्ष डॉक्टर संजय महाजन आणि सचिव आदेश कांडेलकर पत्रकारांचे आरोग्य जपण्याचे काम उत्कृष्टपणे करतील, अशी अपेक्षा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. डॉ. संजय महाजन हे एबीपी माझा या नावाजलेल्या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी असून सामाजिक प्रश्नांची जाण असलेले पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. तर आदेश कांडेलकर यांनी सुद्धा विविध मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
◾◾◾◾◾



