विशेष बातमी

बुलढाणा मतदार संघात ताईंचा बोलबाला, परिवर्तनाचा ठाम विश्वास!

बुलढाणा मतदार संघात ताईंचा बोलबाला, परिवर्तनाचा ठाम विश्वास!

बुलढाणा : विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्‍हेंबरला मतदान पार पडल्यानंतर आता निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विद्यमान आ.संजय गायकवाड व महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांच्या अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले असतांना या मतदार संघात झालेल्या 62.39 टक्के मतदानामुळे मतदारांनी परिवर्तन घडविण्याचा ठाम निर्धार केला असल्याचे दिसून येत आहे.
कधी नव्हे ते यावेळी पहिल्यांदा या मतदार संधाची निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतल्याचे चित्र सुरूवातीपासूनच दिसू लागले होते. ताईंच्या प्रचारसभा व रॅलींना होणारी प्रचंड गर्दी ही मतामध्ये परिवर्तीत होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. रोड शो व रॅलींमध्ये सहभागी होणारे सुशिक्षित उमेदवार ताईंसाठी जमेचा मुद्दा ठरला आहे. काहींनी रॅली किंवा सभांमध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेता मतदान करतांना ताईंचे केलेले गुप्त समर्थन महाविकास आघाडीची ताकद वाढविणारे ठरणार आहे. बुलढाणा मतदार संघात दिशाच्या माध्यमातून केलेले महिलांचे संघटन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेच. दुसरीकडे त्यांचा शांत,संयमी व सर्वजाती धर्मातील मतदारांशी असलेले व्यक्तीगत नातेही त्यांना पूरक ठरणार आहे. तर, दुसरीकडे ओबिसी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे पती सुनील शेळके यांना मानणारा वर्गही ताईंच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे. या शिवाय महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपसी मनभेद, हेवेदावे विसरून ताईंच्या विजयासाठीचे शिवधनुष्य प्रचाराच्या प्रारंभापासूनच आपल्या खांद्यावर घेतले असल्याने विजयाची शाश्वती निर्माण झाली आहे. मतदार संघातील लाडक्या बहिणींसह भावांचाही ताईंना मोठ्या संख्येने पाठींबा मिळाला असल्याने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणे तेव्हढी औपचारिकता उरली असल्याचे दिसते आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button