राष्ट्रीय

बुलढाणा शिवजयंती सोहळा समाजासाठी दिशादर्शक- ना. फुंडकर*

आ.संजय कुटे, आ. मनोज कायंदे, विद्याधर महाले यांचेसह आ. संजूभाऊंची शिवसोहळ्याला शिवभेट !

*बुलढाणा शिवजयंती सोहळा समाजासाठी दिशादर्शक- ना. फुंडकर*
आ.संजय कुटे, आ. मनोज कायंदे, विद्याधर महाले यांचेसह आ. संजूभाऊंची शिवसोहळ्याला शिवभेट !

बुलढाणा:
शिवनिमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख टाळणे, मिरवणुकी डीजे मुक्तीचा संकल्प करणे.. यासह शिवजयंती केवळ एक दिवस नव्हेतर “शिवसप्ताह” म्हणून आठवडाभर विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करणे, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाचे असे विविध उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याच्या भावना महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर यांनी व्यक्त केल्या. तर बुलढाणा येथील शिवजयंती सोहळ्यातील उपक्रमांचे कौतुक जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे तर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी व्यक्त केल्या. यावेळी स्थानिक आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचे प्रामुख्याने उपस्थित होती.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती बुलढाणा २०२५च्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याचा शिवारंभ शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर शिवकीर्तनाने झाला होता. बुधवार १९ फेब्रुवारी पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल आहे.

शिवजयंती सोहळ्यात आज रविवार १६ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक स्पर्धा सुरू झाल्या, पहिल्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून डफावर थाप देत दिवस गाजवला. या स्पर्धेचे उद्घाटन धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड व सौ. वसुंधरा गायकवाड यांच्याहस्ते झाले. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतीक दिलीपभाऊ जाधव व सौ. उत्कर्षा प्रतीक जाधव यांच्यासह सरकारी अभियोक्ता योगेश अंभोरे व छायाताई अंभोरे, मुकुल वासनिक विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. संतोष वानखेडे व शिल्पा वानखेडे यांची उपस्थिती होती.

दिवसभर चाललेल्या पोवाडा स्पर्धेला कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे तर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी भेटी दिल्या. या सर्वांचे स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, कोषाध्यक्ष अरविंद होंडे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शैलेश खेडकर, समन्वयक वैशाली ठाकरे, विशाल शेळके गोपालसिंग राजपूत, राहुल जाधव व सौ. अनुष्का जाधव यांच्यासह संस्कृतिक समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button