बुलढाण्याची लेक सौ सविता शेळके यांना ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार:
अहिल्यानगर सरपंच सेवा संघाच्या वतीने पुरस्काराचे केले वितरण..

बुलढाण्याची लेक सौ सविता शेळके यांना ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार:”अहिल्यानगर सरपंच सेवा संघाच्या वतीने पुरस्काराचे केले वितरण..
बुलढाणा:अहिल्या नगर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५ जनसेवा हिच ईश्वरसेवा मानून परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निस्वार्थी आदर्श व्यक्तिमत्व सौ सविता दत्तात्रय शेळके या आपल्या गावपातळीवर सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहेत.. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.. आत्मविश्वास, जिद्दीने ध्येय साध्य करीत अकोला सारख्या शहरात उत्तुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपडत करीत होत्या.सौ सविता दत्तात्रय शेळके या मुळच्या चिखली तालुक्यातील शिरपूर येथील आहे.मात्र पतीच्या नोकरी निमित्त अकोला येथे स्थायिक झाल्या आहे. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते सौ सविता शेळके यांना राज्यस्तरीय समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित आले..यावेळी सरपंच सेवा संघाचे रोहित पवार, बाबासाहेब पावसे आणि अमोल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती..