क्राईम बातमी

बुलढाण्यात पकडली चक्क अफूची शेती , १२ कोटी ६१ लाखांची अफूची झाडे जप्त.*

बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई.*

 

*बुलढाण्यात पकडली चक्क अफूची शेती , १२ कोटी ६१ लाखांची अफूची झाडे जप्त.*

*बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई.*

*अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.*

राज्यात अनेक ठिकाणी गांजाची शेती वर कारवाई करण्यात येत आहे. बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ८ क , १८ का व एन डी पी एस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल जात आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचचून अफूची शेती होत असल्याने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button