बुलढाण्यात विद्यार्थ्यांची पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे अजब मागणी
बुलढाण्यात विद्यार्थ्यांची पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे अजब मागणी

*बुलढाण्यात विद्यार्थ्यांची पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे अजब मागणी.*
*व्यथित विद्यार्थ्यांनी पत्र लिहून केली महत्त्वाच्या परीक्षा जून मध्ये घेण्याची मागणी.*
*व्यथित विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा ध्वनी प्रदुर्षणाचा मुद्दा एरणीवर.*
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर अनेक महत्त्वाच्या परीक्षा जसे वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा , सामायिक प्रवेश परीक्षा येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या , भवितव्यासाठी व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे दिवस आहेत. मात्र याच दिवसात ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी धार्मिक कथा वाचन , भागवत सप्ताह व भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात असतात. साधारणतः दिवसभर आणि रात्री अकरा वाजेपर्यंत हे कार्यक्रम सुरू असल्याने व या कार्यक्रमांवर कुठलीही आवाजाची मर्यादा नसल्याने विद्यार्थ्यांना याचा अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आमच्या परीक्षा व महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा या जूनमध्ये घ्याव्या अशी अजब मागणी बुलढाण्यातील व्यथित विद्यार्थ्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या मागणीमुळे मात्र पुन्हा एकदा ध्वनी प्रदूषण मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शिव महापुराण कथा,भागवत सप्ताह, किर्तन सप्ताह अशा प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. साधारणतः सकाळी पाच वाजेपासून हे कार्यक्रम सुरू होतात तर रात्री 11 पर्यंत हे विविध कार्यक्रम सुरूच असतात. या कार्यक्रमांच्या ध्वनी प्रक्षेपकांच्या आवाजावर मात्र कुठलेही नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांना सध्या परीक्षा काळात अभ्यासात याचा व्यत्यय येत आहे. शिवाय हे धार्मिक कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे असल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यातच हे कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त असल्याने आमच्या परीक्षा या जून महिन्यात घेण्यात याव्या जेणेकरून जून महिन्यात शेतकरी व इतर नागरिक आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे आम्हाला अभ्यास करण्यास सोयीचे जाईल असं कारणही या पत्रात नमूद करण्यात आल आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या विद्यार्थ्यांनी हे पत्र लिहून मागणी केली आहे.



