बातमी

भारतरत्न स्व.अटलजी वाजपेयी यांना जयंती निमित्त शिवालयात अभिवादन

भारतरत्न स्व.अटलजी वाजपेयी यांना जयंती निमित्त शिवालयात अभिवादन

भाजपा सदस्यता अभियानास शिवालयातुन सुरवात

बुलडाणा:- आज माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलजी वाजपेयी यांच्या आज जयंती निमित्त भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय “शिवालय” येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला.

यावेळी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी स्व.अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पणकरून आदरांजली अर्पण केली. भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यापासून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहा तील 50 वर्षांपेक्षा जास्त संसद सदस्य म्हणून पुढे पंतप्रधान पदापर्यंत अटलजींनी भूमिका बजावली.ज्या राजकारणात लोकांचे आयुष्य निघुन जाते, अटल बिहारी वाजपेयींनी तेवढी वर्ष राजकारण केलं आहे.
आपल्या 13 दिवसांच्या सरकारला वाचविण्याकरीता अटलजींनी केलेले अयशस्वी प्रयत्न आजवर कुणीही विसरले नसेल. “ज्या सरकार ला वाचविण्याकरीता असंवैधानिक पाऊले उचलावी लागतील त्या सरकारला चिमटयाने देखील स्पर्श करणे मला मान्य नाही”.असा लोकशाही तत्वाचा व स्वाभिमानी नेता परत होणे नाही असे प्रतिपादन मा. आमदार विजयराज शिंदे यांनी केले.

तसेच या औचित्यावर भाजपा सदस्यता अभियानाची सुरवात भारतीय जनता पार्टीने केली आहे. या अभियानाची सुरवात देखिल आज शिवालय कार्यालयातून करण्यास सुरुवात झाली आहे .भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी स्वतः काही कार्यकर्त्यांच्या भाजपा सदस्यत्व ची नोंदणी करून या अभियानाचा शुभारंभ केला.

या अभिवादन व भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी कार्यक्रमास भाजपा जिल्हा सचिव श्री चंद्रकांत बरदे, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार,प्रदेश प्रतिनिधी श्री अण्णाजी पवार,यतीन पाठक, गणेश पांडे,अकिल हाजी,माजी नगरसेवक संजय अग्रवाल, ऍड दशथसिंग राजपूत, प्रशांत बोरसे, चि स्वराज शिंदे, अकिलभाई, अमोल जाधव, अविनाश शेंडे यांसह भाजपा आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button