बातमी
मतदारसंघातील समस्येसाठी आमदार मनोज कायंदे अॅक्शन मोडवर

मतदारसंघातील समस्येसाठी आमदार मनोज कायंदे अॅक्शन मोडवर
* शेतकऱ्यांची समस्या त्यांनी तत्काळ सोडवली
देऊळगाव राजा
कष्टकरी शेतकरी हा कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच अडचणीत असल्याने शेतकऱ्याला नाहक त्रास भोगाव लागतो. याचे एक प्रत्यय आले ते पळसखेड चक्का येथील गेल्या एक वर्षापासून शेतामध्ये डीपी बंद अवस्थेमध्ये होती म्हणून शेतकऱ्याचे खरीपचे पीक तर गेलेच पण रब्बीचे पीक सुद्धा हातामधून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.
या त्रासाला कंटाळून पळसखेड चक्का येथील शेतकरी वर्गाने नवनियुक्त आमदार मनोज कायंदे यांची २३ डिसेंबर रोजी भेट घेतली. यावेळी शेतकरी यांनी आमदार कायंदे यांना शेतीविषशी भेडसावत असलेल्या समस्या समजून सांगितल्या. आणि शेतकऱ्याला रब्बी पिकाला लाईट नसल्यामुळे पीक हातातून जाणार आहे असे सांगितल्यानंतर त्यावर लगेच त्यांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला सूचना देऊन पळसखेड चक्का येथील डीपी ताबडतोब बसवावे, असे आदेश दिल्यानंतर २७ डिसेंबर रोजी येथील डीपी बसवण्यात आल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रब्बीचे पीक शेतकऱ्यांची गहू, हरभरा, शाळु आणि बीज उत्पादक शेतकरी यांना दिलासा मिळाला. यावेळी उपस्थित शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वय बालाजी सोसे, अर्जुन मुंडे, गणेश सोसे ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग सोसे, प्रमोद नागरे, राहुल आंधळे, धनंजय सोसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



