मतदारांची उध्दव ठाकरेंना सहानुभूती, खरातांचे खुलणार भाग्य!

मतदारांची उध्दव ठाकरेंना सहानुभूती, खरातांचे खुलणार भाग्य!
मेहकर : विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. विविध एक्झीट पोलचे निकाल येत आहेत. मात्र त्या निकालात फारशे तथ्थ्य नसल्याचे आता मतदार बोलू लागले आहेत. मेहकर विधानसभेत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये होत असलेल्या लढतीकडे मतदार गद्दारी विरूध्द खुद्दारी असे पाहत आहेत. मतदारांची उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती मिळत असल्याने सर्व जाती धर्माच्या मतदारांनी सिध्दार्थ खरात यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला असल्याने खरातांचे भाग्य खुलण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपसी मतभेद विसरून खरातांसाठी केलेले काम त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणारे ठरणार आहे. महायुतीच्या उमेदवाराने मागील काही काळात एका विशिष्ट समाजातील व्यक्तीला केलेली अश्लील भाषेतील शिविगाळ व जिवे मारण्याची दिलेली धमकी आणि व्हायरल झालेली क्लीप मतदार संघातील जनतेत असंतोष निर्माण करणारी ठरली. गेल्या पंधरा वर्षापासून मेहकर मतदार संघात दखलयोग्य कोणतीच विकास कामे झाली नसल्याची सुप्त भावनाही मतदारांच्या मनात आहे. याशिवाय एकाच उमेदवाराला वारंवार निवडूण का आणायचे? आता परिवर्तन घडविण्याची भावनाही मतदारांच्या मनात आहे. धर्मवीर दिलीपराव रहाटे यांना मानणारा वर्गही यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभा राहल्याचे दिसून येते. सिध्दार्थ खरात यांनी प्रचाराच्या सुरूवातीपासूनच वारकरी, हरिभक्त पारायण किर्तनकार यांना सोबत ठेवत आपली वेगळी प्रतीमा तयार केली. त्यामुळे ते कुठल्या एका समाजाचे कट्टर अनुयायी नाहीत हे मतदार संघातील जनतेला पटवून देण्यात ते यशस्वी ठरले असल्याने तेही त्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतांचे विभाजन करण्यासाठी कोणी मैदानात उतरविले, याचीही माहिती मतदारांना आहे. त्यामुळे वंचितला मतदान म्हणजे महायुतीला मतदान असा जोरदार प्रचार झाल्याने बौध्द मतदारांनी आपला उमेदवार म्हणून खरातांना गावागावात पसंती दिल्याचे दिसून येते याचा फायदा खरातांना नक्कीच मिळणार असल्याचे चित्र आहे.



