बातमी

मनोरुग्णांना अन्नदान करत बुद्धपौर्णिमा साजरी

सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम.

मनोरुग्णांना अन्नदान करत बुद्धपौर्णिमा साजरी

सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम..

बुलढाणा,
बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील ठिकठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यादरम्यानच, बुलढाणा येथील वरवंड फाटा स्थित ‘दिव्य सेवा प्रकल्प’ आश्रमात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मनोरुग्ण बांधवांना फळ आणि किराणा वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, आश्रमातील दिव्यांग, बेसहारा व मनोरुग्ण बांधवांना अन्नदान करण्यात आले.बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमाने आश्रमातील बांधवांचा चेहरा आनंदाने फुलला होता. आश्रमाचे संचालक अशोक काकडे यांनी आश्रमाबद्दलची माहिती व वर्षभर राबविण्यात येणारे विविध विविध उपक्रम सांगितले. त्याबरोबरच, मनोरुग्ण बांधवांना फळ आणि किराणा वाटप केल्याने सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आभार देखील मानले. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत, दीपक मोरे,अमोल वाठोरे, नितीन डोंगरदिवे,गजेंद्र वाघ, राजकुमार गवई,आर्यन साबळे, सुरेश सरकटे,विशाल,प्रेम इंगळे,आदींची उपस्थिती होती.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button