बातमी

मनोरुग्णांना लाभली हक्काच्या बहिणीची माया!

दिव्यसेवा प्रकल्पात जयश्रीताईंनी साजरे केले रक्षाबंधन!

बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथे मनोरुग्ण, निराधारांना आधार देता यावा, त्यांची सेवा करता यावी या उदात्त विचारांतून अशोक काकडे व ज्योती काकडे या दाम्पत्याने दिव्यसेवा प्रकल्पाची सुरुवात केली. या मनोरुग्णांना आणि निराधारांना हक्काच्या बहिणीची माया मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी दिव्यसेवा प्रकल्पाला भेट देवून मनोरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

दिव्य सेवा प्रकल्पाची ख्याती आता सर्वदूर पसरली आहे. जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आणलेल्या मनोरुग्णांची निस्वार्थ सेवा या प्रकल्पाच्या माध्यामातून केली जात आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यात आणि राहणीमानात सुधार व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न याठीकाणी केले जातात. याच अनुषंगाने येथील मनोरुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी तसेच नात्यांविषयी आपुलकीची व सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी दिव्यसेवा प्रकल्पाला भेट देवून मनोरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी संस्थापक अशोक काकडे, सुरेखाताई तायडे, अनिताताई गायकवाड, सुनिताताई, स्मिताताई वराडे, रुपालीताई उबरहंडे इ.उपस्थित होत्या.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button