क्राईम बातमी

मलकापूर रोड कविता हॉटेल समोर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पथकाने केला जप्त…

मलकापूर रोड कविता हॉटेल समोर अवैध वाहतूक करणारा टिप्पर पथकाने केला जप्त…

 

बुलढाणा मलकापूर रोडवर दुपारच्या सुमारास पूर्णा नदी पात्रातून उपसलेली रेती टिप्पर द्वारे बुलढाणा शहरात आणली जात असून अशाच एक अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर वर बुलढाणा तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली आहे मलकापूर रोडवरील बुलढाणा हॉटेल कविता जवळ बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर अडवून तपासणी केली तपासणी दरम्यान चालकाकडे रॉयल्टी चौकशी केली असता त्याने जुनी रॉयल्टी दाखवून वाळूची वाहतूक ही अवैद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर टिप्पर जप्त करून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांना
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे दिलीप पायघन ईश्वर सिंग भांबळे तलाठी गोपाळ राजपूत तसेच वाहन चालक अशोक देवकर या पथकाला मलकापूर रोड परिसरात पाळत ठेवण्यासाठी रवाना केले होते
यादरम्यान हा टिप्पर जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button