बातमी

महाकवी वामनदादा कर्डक यांची लेखणी समाजाला ऊर्जा पुरवणारी…! -आमदार संजय गायकवाड


महाकवी वामनदादा कर्डक यांची लेखणी समाजाला ऊर्जा पुरवणारी…! -आमदार संजय गायकवाड

बुलढाणा (प्रतिनिधी) समाजप्रबोधनकार,डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याचा प्रचार प्रसार आपल्या काव्य,शाहिरी आणि गीताद्वारे करणाऱ्या वामनदादा कर्डकांची लेखणी मनाला उभारी देणारी,नवं बळ,ऊर्जा पुरवणारी आहे.त्यांनी ज्या निष्ठेने आणि आयुष्याच्या शेवटापर्यन्त आंबेडकरी तथा तळागाळातील सर्वच शोषित समाजाला उभारी देण्यासाठी कार्य केले त्यांच्या कार्याला मराठी मन कदापिही विसरू शकत नाही.तसेच येत्या काही दिवसातच बुलढाणा जिल्हास्तरीय जेष्ठ कलावंत मानधन निवड समिती जाहीर करण्यात येऊन कळावंतांचे प्रलंबित निवड यादी निकाली काढण्यात येईल असे विचार स्थनिक आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी वामनदादा कर्डक यांच्या 21 व्या स्मुर्तीदिनी स्थानिक हुतात्मा स्मारक येथील वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यासमोर आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना मांडले.* महाकवी वामनदादांच्या लेखणीने समाजाला दिशा दिली – महाकवी वामनदादा कर्डक यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी लेखणी झिजवली. वामनदादांच्या गीतांनी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा व समाजाला दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन आ. संजय गायकवाड यांनी केले.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या २१ व्या स्मृतीदिनानिमित्त येथील पं. कानडे शास्त्री उद्यानातील महाकवी वामनदादा कर्डक स्मारकावर १५ मे रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आ. गायकवाड बोलत होते. वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुंबई येथील प्रा. जयमंगल धनराज, शिवसेना(उबाठा) नेते सुमीत सरदार , कामगार नेते अशोक दाभाडे, पत्रकार राजेंद्र काळे, अजय बिल्लारी, रणजितसिंग राजपूत, सिध्दार्थ आराख, सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, अमोल खरे, रिपाइं नेते नवाब मिर्झा, चांडोळ येथील महिला कलावंत श्रीमती जिजाबाई जग्गनाथ अवकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी पुढे बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची अठरापगड समाजाला सोबत घेऊन चालण्याची कार्यपध्दती पुढे राजर्षी शाहू महाराज यांच्या आरक्षण धोरणापर्यंत सुरु राहिली. त्याच विचारांचा वारसा घेऊन बुलढाणा परीसरात समाजाला प्रेरणा देणारी महापुरुषांची २६ स्मारके निर्माण केली. या मालिकेत महाकवी वामनदादा कर्डक यांचे योगदान खूप महत्वाचे असल्याने महाराष्ट्रातील त्यांचा पहिला पुतळा स्मारक स्वरूपात बुलढाणा शहरात उभा करण्यात आला. आणखी ५ स्मारके प्रस्तावित असून यामध्ये सम्राट अशोक स्मारकाचा समावेश आहे, अशी माहिती आ. संजय गायकवाड यांनी दिली तसेच कलावंत मानधन समितीची स्थापना येत्या १५ दिवसात करणार असल्याचे सांगून वामनदादांच्या पुतळ्याच्या जागेचा आणखी विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी यावेळी सभास्थानी ऍड सुमित सरदार,कुणाल पैठणकर, पत्रकार राजेंद्र काळे,पत्रकार रंजितसिंग राजपूत,पत्रकार सिद्धार्थ आराख,अजय बिलारी, अमोल खरे,अजय बिलारी, ऍड जयमंगल धनराज, अशोक दाभाडे,जिजाबाई जग्गनाथ अवकाळे,नबाब मिर्झा इत्यादी विराजमान होते.लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशिय प्रतिष्ठान बुलाढाणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रारंभी अतिथी व उपस्थितनांनी वामनदादा कर्डकांच्या पुतळ्याला पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर काही निवडक कवि ज्यात विजय वानखेडे मांडकेकर,मोहन सरकटे, आदिशक्ती भजनी मंडळ चांडोळ,मल्हारी गवई आणि इतर गीतकारांनी, गायकानी गिते सादर केल्यावर प्रतिष्ठानचे सचिव तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विषद केली.यावेळी ऍड सुमित सरदार यांनी वामनदादा कर्डक यांना अभिवादनपर मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,या वर्षीपासुन पुढे दरवर्षी आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारा वामनदादा कर्डक यांच्या नावाने रोख रुपये 11,000/- चा राज्यस्तरीय पुरस्कार उत्कृष्ट सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कलावंतास देण्यात येईल.त्याकरीता वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा.यावेळी उपस्थितनांनी त्यांच्या घोषनेचे टाळ्या वाजवून प्रतिसाद देत स्वागत केले.यानंतर पत्रकार राजेंद्र काळे,रंजितसिंग राजपूत, अमोल खरे,कुणाल पैठणकर,अशोक दाभाडे यांनी अभिवादनपर मनोगत मांडले. यावेळी इंजि.विजय पांडुरंग मोरे,कवी मांगीलाल राठोड,कॉम्रेड पंजाबराव गायकवाड,निवेदक तथा नाट्यकर्मी शशिकांत इंगळे,गायक रमेश आराख, कल्पना खंडेराव,पत्रकार सुनील मोरे,मिलींद वानखेडे,अनंता मिसाळ, सुरेश सरकटे,विजय डोंगरदिवे,शाहिर सुरेश अवसरमोल,शाहिर सुखदेव जाधव,नांद्राकॊळीचे भास्कर जाधव,शाहिर निवृत्ती तायडे,गोविंदा हिवराळे,देविदास वानखेडे राष्ट्रपाल वानखेडे, धोरपगावचे शाहिर धुरंधर,मंगल मिसाळ शेतकरी संघटनेचे वामनराव जाधव,डी पी वानखेडे, दामोधर साळवे,आत्मराम चौतमल,पद्माकर डोंगरे, केशरताई इंगळे वासाडीकर,बबन गवई,धम्मा गवई भजनी मंडळाच्या महिला कलावंत,शंकर महाराज,मनोहर पवार,सुदर्शन अहिरे,देविदास वानखेडे वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यासाठी बुलढाणा शहर आणि परिसरातील तसेच जिल्हाभरातून चिखली,लोखंडा,मांडका, मोताळा,हरसोडा,चिखला,बभादोला,नांद्राकोळी इत्यादी ठिकाणाहून गायक, शाहिर, कलावंत महिला पुरुष बहुसंख्येने जमले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिर डी आर इंगळे,सिद्धार्थ आराख, सुरेश साबळे,विजय मोरे, अनंता मिसाळ, शाहिर सरदार, शशिकांत इंगळे,धम्मा गवई,मोहन सरकटे, बबन गवई तथा लोककवी वामनदादा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी श्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष शाहिर डी आर इंगळे,प्रास्ताविक सचिव साहित्यिक सुरेश साबळे आणि आभार पत्रकार सिद्धार्थ आराख यांनी केले

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button