बातमी
महात्मा जोतिबा फुले उत्सव समिती अध्यक्षपदी गोपाल निलकंठ, महिला अध्यक्ष वंदना निलकंठ

महात्मा जोतिबा फुले उत्सव समिती अध्यक्षपदी गोपाल निलकंठ, महिला अध्यक्ष वंदना निलकंठ
बुलढाणा
महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक उत्सव समिती २०२६ ची नवीन कार्यकारणी गठीत करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन १२ फेब्रवारी रोजी करण्यात आले होते. मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणीची घोषणा करतांना गोपाल निलकंठ यांची अध्यक्षपदी निवड लक्ष्मीकांत बगाडे यांनी केली. महिला अध्यक्षा प्रीती खंडारे यांनी महिलांच्या अध्यक्षा म्हणुन वंदना निलकंठ यांचे नाव जाहीर केले. यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



