बातमी

मानसात देव समजनारे डॅा. सुभाष जोशी व डॅा.दत्ता भराड यांना डॅा.खासबागे मानव सेवा पुरस्काराने सन्मानित

मानसात देव समजनारे डॅा. सुभाष जोशी व डॅा.दत्ता भराड यांना डॅा.खासबागे मानव सेवा पुरस्काराने सन्मानित

बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा येथील स्वर्गीय डॉ.अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार गेल्या दहा वर्षा पासून त्यांची मुले प्रेम आणि आशिष चालवत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात जे सेवाभावी सेवा देतात त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून गेली दहा वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. तोच उपक्रम ठेवून या वर्षीचा पुरस्कारचे २०२५ चा वितरण सोहळा स्थानिक बुलडाणा येथील द्वारका हॉटेल सभागृहामध्ये डॉ.अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा डॉ.खासबागे मानव सेवा पुरस्कार यावर्षीचा ज्याच्या पोटात नाही त्याच्या पोटात घाला उपासनी पोटी कोणीही जाता कामा नाही असे सांगणारी त्यांची सहचारिणी त्या शब्दांचे अनुकरण करणारे गोरगरीबांना वैद्यकीय सेवा देणारे गरिबी काय असते हे जवळून पाहणारे गरिबीचे चटके कसे असतात हे माहीत असल्यामुळे त्यांची जाणीव ठेऊन प्रत्यक्ष कृतीत आणनारे ज्यांचे जवळ पैसे असो नसो भाड्याला पैसे देऊन कित्येक गोरगरीबांना निस्वार्थी सेवा देणारे मराठवाड्यातील ग्राम वालसावगीचे मुळ निवासी असलेले बुलडाणाचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तीन दशकाहून अधिक वैद्यकीय सेवा देणारे रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा माननारे डॉ.सुभाष मुरलीधर जोशी व एक कंपाडरचा एक डॅाक्टर होतो हे दाखवून देणारे जिद्द चिकाटी संघर्षच्या जोरावर डॅाक्टर होऊन गोरगरीबांना वैद्यकीय सेवा देणारे जेव्हढे असेल तेव्हढे द्या नसेल तर जाऊद्या असी सेवाभावी वैद्यकीय सेवा देणारे दानसूर त्यांचा जीवन पट ऐकला की, मन हेलावून जाते असे चिखली येथील डॉ.दत्ता गणपत भराड यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजित शिरसाट,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी, संजयजी बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या कार्याचा शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार प्रदान करण्यात आला व त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी दिर्घ आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ.शिवानी बोथरा या उत्कृष्ट गुणांनी एमडी रेडिओलॉजी उत्तीर्ण झाल्या म्हणून डॉ.अजित शिरसाठ यांच्या हस्ते त्यांना शाल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पुरस्कार वितरणाचा उद्देश व पुरस्कार वितरणाचे निकष डॉ.आशिष खासबागे यांनी विषय केले आपल्या मनोगतातून डॉक्टर परिहार यांनी डॉ. जोशी व डॉ.दत्ता भराड यांच्या वैद्यकीय सेवेचा व सामाजिक बांधिलकीचा उपस्थितांना परिचय करून दिला तसेच डॉ. बोथरा यांनी वैद्यकीय सेवेची आव्हान याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच डॉ.भागवत भुसारी यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी एमडीओलॉजी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. शिवानी बोथरा यांचा देखील सत्कार करण्यात आला आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ.भराड यांनी मला माझ्या गुरुच्या नावाने पुरस्कार मिळाला ही पुंजी मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील असे भावनिक उदगार काढले तसेच डॉ.जोशी यांनी हा माझा सत्कार नसून माझ्या प्रत्येक रुग्णाचा सत्कार असल्याचे नमूद केले आपल्या अध्यक्ष भाषणात डॅा. शिरसाठ यांनी डॉक्टर खासबागे यांनी आम्हाला वैद्यकीय सेवेचा मूलमंत्र दिला तो आम्हास प्रेरणादायी राहील या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपंग निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक कवी रमेश आराख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रेम खासबागे यांनी केले सदर कार्यक्रमाला डॉ.उकार्डे,डॉ.भागवत, डॉ.पुंडकर,डॉ.स्वप्नील भराड,डॉ.परीहार,डॉ.शिवानी बोथरा,डॉ.सुनिता बोथरा,दैनिक सम्राट,दै.सामपत्र चे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव,दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी हर्षानंदन वाघ,आर्यन खासबाग, डॉ.वर्षा खासबागे,सुचेता खासबागे,कबीर खासबागे,मुरलीधर भोपळे,पीएसआय पाटील ,अविनाश काळे, डॉ.कुलकर्णी ,विकी चव्हाण, चंद्रशेखर जोशी,डॉ.श्रीराम जोशी,गजानन शिरसागर,डॅा.कोथळकर या पुरस्कार वितरण सोहळ्याला शहरातील व शहराबाहेरील शिक्षण,वैद्यकीय,पत्रकारिता विधीक्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button