मुंबई येथील आघाडीच्या बैठकीत 50 राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सहभागी होणार – भाऊसाहेब बावने

मुंबई येथील आघाडीच्या बैठकीत 50 राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सहभागी होणार – भाऊसाहेब बावने
भारतीय जन आघाडीची मुंबईत 18 डिसेंबरला नियोजन बैठक
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटीत आणी एकत्रित लढण्या करीता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणी संघटना यांना आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत 50 राजकीय पक्ष आणी संघटना एकत्र आल्या असुन त्यांनी आघाडी ला संमती दिली आहे.भारतीय जन आघाडी या नावाने आघाडीची अधिकृत घोषणा करण्या करीता सोमवार दिनांक 18 डिसेंबर 23 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथील पत्रकार भवनात भारतीय जन आघाडीची बैठक दुपारी 1 वाजता आयोजीत केली आहे.या बैठकीत आघाडीची घोषणा करण्यात येत असुन आगामी लोकसभा आणी विधानसभा निवडणुका या आघाडीच्या वतीने लढविण्यात येणार असल्या बाबत नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती भारतीय जन सम्राट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आघाडीचे महाराष्ट्रातील संयोजक तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांनी सांगीतले आहे.
ही आघाडी स्थापन करण्या करीता आघाडीचे संयोजक राजेंद्र वनारसे तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांच्यासह ओबीसी एन टी पार्टी चे अध्यक्ष संजय कोकरे,बाळासाहेब साबळे यांची भुमीका महत्वाची असुन या आघाडी करीता सर्वच घटक पक्ष आणी संघटना यांनी सुध्दा प्रयत्न केले आहेत या आघाडीत खालील पक्ष आणी संघटना यांनी संमती दर्शविली आहे.
- भारतीय जन सम्राट पार्टी – राष्ट्रीय अध्यक्ष,भाऊसाहेब बावने (बुलढाणा)
- राष्ट्रीय संत संदेश पक्ष – राष्ट्रीय अध्यक्ष,राजेंद्र वनारसे (लातूर)
- बाहुबली जनता पार्टी – अध्यक्ष,बाळासाहेब साबळे (वाशीम)
- गोंडवाणा गणतंत्र पार्टी – अध्यक्ष,हरीषजी उईके (नागपूर)
- जनहित लोकशाही पार्टी – अध्यक्ष,अशोक अलाट (मुंबई)
- भारत जनाधार पार्टी – अध्यक्ष,सुरेंद्र अरोरा (मुंबई)
- इंडिया अगेन्सट करप्शन पुणे – अध्यक्ष,हेमंत पाटील (पुणे)
- राष्ट्रीय जनक्रांती पार्टी – अध्यक्ष,हिंम्म्तराव कोरडे (नाशिक)
- अखिल भारतीय बंजारा सेना पक्ष – राष्ट्रीय अध्यक्ष,डॉ.कांतीलालजी नाईक (जळगाव खांदेश)
- ओबीसी एनटी पार्टी – अध्यक्ष,संजय कोकरे (मुंबई)
- बळीराजा पार्टी – अध्यक्ष,बाळासाहेब रास्ते (यवतमाळ)
- जय विदर्भ पार्टी – राष्ट्रीय उपाध्यक्ष,मुकेश मासुरकर (नागपुर)
- मानव हित कल्याण सेवा संस्था – राष्ट्रीय अध्यक्ष,दिलीप श्रीराम कोसरे उर्फ कोसरे महाराज (नागपुर)
- भारतीय बहुजन क्रांती दल – राष्ट्रीय अध्यक्ष,डॉ. मोरसिंगभाई राठोड (ठाणे)
- भारतीय बंजारा क्रांती दल – प्रदेश अध्यक्ष,नंदूभाऊ पवार (ठाणे)
- राष्ट्रीय जनसेना पार्टी – प्रदेश अध्यक्ष,अशोकभाऊ खैरनार (मुंबई)
- समनक जनता पार्टी – राष्ट्रीय अध्यक्ष,संपतजी चव्हाण (बीड)
- भारतीय जन सन्मान पार्टी – प्रदेश अध्यक्ष,रमेश जाधव (पनवेल मुंबई)
- भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ- संस्थापक अध्यक्ष,अशोक जाधव धनगावकर (संभाजी नगर)
- राष्ट्रीय कामगार संघटना – प्रदेश अध्यक्ष,गोरख गोपीनाथ गव्हाणे (शिरूड पुणे )
- शेतकरी हक्क संघटना – प्रदेश अध्यक्ष,रामकिसन दुबे पाटील (वाशीम)
- अखिल भटका जोशी समाज सेवा संघ – प्रदेश अध्यक्ष,समाधान सांडूजी गुऱ्हाळकर (बुलढाणा)
- प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया – प्रदेश अध्यक्ष,विवेक केशवराव डेहनकर (यवतमाळ)
- गाडिया लोहार घुमंतू जनजाति महासभा – राष्ट्रीय उपाध्यक्ष,मंगेश साधना सीताराम सोळंके (ठाणे)
- राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल युवा मंच महाराष्ट्र प्रदेश – प्रदेश अध्यक्ष,विजय करवंदे (हिंगोली)
- ओबीसी राजकीय आघाडी – संस्थापक अध्यक्ष,प्रा.श्रावण देवरे (नाशिक)
- राष्ट्रीय बंजारा परिषद – संस्थापक अध्यक्ष,किसनभाऊ राठोड (वाशीम)
- भटके विमुक्त आदिवासी इतर मागास प्रवर्ग परिषद,महाराष्ट्र राज्य – संस्थापक अध्यक्ष,कैलासराव भंडलकर (ठाणे)
- बंजारा पॅंथर महाराष्ट्र -संस्थापक अध्यक्ष, इंजि.रोहिदास पवार (बीड)
- जगतगुरु राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज फाउंडेशन – संस्थापक अध्यक्ष,कुंडलिक भाऊ पवार (नाशिक)
- हिंदुस्थान जनता पार्टी – राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड.बबनगिर गोसावी (औरंगाबाद)
- संघर्ष सेना – राष्ट्रीय अध्यक्ष,हरिश्चंद्र दत्तू पाटील (ठाणे)
- राष्ट्रीय जनता दल – महाराष्ट्र अध्यक्ष,विजय सुरेश कंडारे (औरंगाबाद)
- हिंदू ऐकता आंदोलन पार्टी – राष्ट्रीय अध्यक्ष,रामसिंगभाऊ बावरी (नाशिक)
- लोक क्रांती सेना – महाराष्ट्र संपर्क प्रमुख,संजय देवरे (जळगाव खा)
- भारतीय प्रजा सुराज्य पक्ष – राष्ट्रीय अध्यक्ष,दशरथ राऊत (बारामती)
- रिपब्लिकन बहुजन सेना – राष्ट्रीय अध्यक्ष,विजय घाटे साहेब (राष्ट्रीय महासचिव,मुशताक मलिक साहेब (ठाणे))
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के) – अध्यक्ष,राजाराम खरात (मुंबई)
- नेटिव्ह पीपल्स पार्टी – प्रदेश अध्यक्ष,दीपा राऊत (कल्याण)
- सर्व समाज ओबीसी महाआघाडी – प्रदेश अध्यक्ष,संतोष आंबेकर (मुंबई)
- महाराष्ट्र क्रांती संघटना – प्रदेश अध्यक्ष,प्रकाश बापू कोकरे (अंधेरी,पश्चिम मुंबई)
- सरदार वल्लभभाई पटेल पार्टी – राष्ट्रीय अध्यक्ष,कल्पेश पटेल (गुजरात)
- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तथा शोषित वंचित पार्टी – प्रदेश अध्यक्ष,डॉ.ॲड.पी.बी.कुंभार (पुणे)
- आगरी सेना – अध्यक्ष,मुंबई प्रदेश,जयेंद्रदादा खुणे (मुंबई)
- दलीत शोषित पिछडा वर्ग अधिकार दल – प्रदेश अध्यक्ष,गोविंदराम प्रजापती (पुणे)
- महाराष्ट्र विद्यार्थी ओबीसी परिषद – प्रदेश अध्यक्ष,प्रमोद पाटील (जळगाव खान्देश)
- ओबीसी वॉरिअर्स मिशन – प्रदेश संयोजक,बलदेव आडे (नागपुर)
- जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था – राष्ट्रीय संस्थापक,संजय हाळनोर (औरंगाबाद)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (फॉर्मिस्ट) – राष्ट्रीय अध्यक्ष,समाधान नावकर (ठाणे) राष्ट्रीय संस्थापक,संजय हाळनोर (औरंगाबाद)
- चंद्र सेना- राष्ट्रीय अध्यक्ष, युवराज भुजबळ (पुणे) यांचा सहभाग राहणार असून दिनांक 18 डिसेंबर रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक भाऊसाहेब बावने यांनी दिली आहे.



