बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिखली येथे आगमन

बुलडाणा, दि. १३ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथून चिखली (जि. बुलडाणा) येथील हेलिपँडवर आगमन झाले. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित ‘शिवसंकल्प अभियान – कार्यकर्ता मेळावा’साठी ते आले असून, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत आमदार संजय शिरसाठ उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी त्यांचे स्वागत केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button