बातमी

मेहकर येथील राडाप्रकरणी भाजपाचे ६ पदाधिकारी निलंबित; जिल्हाध्यक्ष गणेश मांटेंनी केली कार्यवाही

मेहकर येथील राडाप्रकरणी भाजपाचे ६ पदाधिकारी निलंबित; जिल्हाध्यक्ष गणेश मांटेंनी केली कार्यवाही

बुलढाणा : मेहकर येथे भाजपा कार्यकर्तामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटें यांनी ही कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी केलेल्या चर्चे अंती ही कारवाई करण्यात आली.

शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर अशी निलंबित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे असून या सर्वांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केला आहे या सर्वांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मेहकरात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटात राडा झाला मुद्द्याची लढाई मुद्द्यावर गेली होती. जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे, हे भाजपा कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते जखमी झाले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button