बातमी

मेहकर लोणार मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करणार : आ.सिद्धार्थ खरात

मेहकर लोणार मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करणार : आ.सिद्धार्थ खरात

शिवसेना ( उबाठा) जाफ्राबाद युवासेना शाखेचे हजारो तरुणांच्या उपस्थितीत उद्घाटन.

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातील सर्व गावात व वाडी वस्त्यावर युवा सेनेच्या शाखा स्थापन करून ग्रामीण भागात युवा सेनेची मोठी फळी निर्माण करणार. त्याचबरोबर पक्ष संघटन सुद्धा मजबूत करणार. असल्याचे प्रतिपादन मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात हे 12 डिसेंबर 2024 रोजी लोणार तालुक्यातील
जाफ्राबाद येथील युवा सेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शाखेचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
आशिष दादा रहाटे (उपजिल्हाप्रमुख,शिवसेना बुलढाणा) हे होते तर मार्गदर्शन नंदू भाऊ कऱ्हाडे (युवासेना जिल्हाप्रमुख,बुलढाणा) प्रमुख अतिथी म्हणून
जीवन शेषराव घायाळ(युवासेना तालुकाप्रमुख,लोणार)
विजय मोरे सर (संचालक कृ.उ.बा.स,लोणार)
स्वप्नील हाडे
गोपाल खोतकर(युवासेना उपतालुका प्रमुख,लोणार) याचं अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी
शाखाप्रमुख शाखाप्रमुख म्हणून स्वप्नील सुरेश ओव्हर,
उपशाखा प्रमुख वैभव गणेश ओव्हर,
सचिव मदन प्रकाश ओव्हर,
सहसचिव प्रदीप शेषराव ओव्हर,
कोषाध्यक्ष श्रीराम जानकीराम ओव्हर,
सल्लागार किशोर पंढरी ओव्हर,
तर सदस्य म्हणून आकाश ओव्हर,विकास वाघमारे,यश ओव्हर,चेतन ओव्हर,हर्षल ओव्हर,प्रभू ओव्हर,आनंद वाघमारे,कुणाल इंगळे,विकास ओव्हर इत्यादींची निवड करण्यात आली.
यावेळी युवा सनेच्या शाखेच्या नुतन पदाधिकारी यांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोषीतील तरूणांची मोठी उपस्थिती होती.

*युवासेनेला लोणार तालुक्यात दिले जीवन घायाळ मोठे योगदान.*

शिवसेना पक्ष फुटी नंतर लोणार तालुक्यात युवा सेनेची काही दुरावस्था निर्माण झाली होती परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने सोबत एकनिष्ठ राहत युवा सेनेचे लोणार तालुका प्रमुख जीवन घायाळ यांनी सातत्याने मागील दोन वर्षापासून पक्ष संघटन उभे करण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे करत आघाडी घेऊन प्रचंड मताधिक्य आमदार सिद्धार्थ खरात यांना मिळून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाची ताकद येणाऱ्या काळात दिसून येणार आहे असल्याचे ते बोलतात. पडत्या काळात जीवन घायाळ यांनी लोणार तालुक्यात युवा सेनेचा केलेला प्रचार प्रसार म्हणजेच संघटन बांधणीसाठी दिलेले मोठे योगदान आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button