मॉं जिजाऊ अर्बन पतसंस्थेला मानाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ 2024 पुरस्कार प्रदान

मॉं जिजाऊ अर्बन पतसंस्थेला मानाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ 2024 पुरस्कार प्रदान

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड तर्फे दिला जाणारा मानाचा दीपस्तंभ 2024 पुरस्कार हा हैद्राबाद रामोजी फिल्म सिटी येथे दिनांक 03 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कॉसमॉस को-ऑप बॅंकेचे अध्यक्ष श्री मिलिंदजी काळे व गोदावरी अर्बन मल्टी स्टेट च्या अध्यक्षा सौ राजश्री ताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने मॉं जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी तायडे, सचिव श्री. नितीन जाधव, कार्यकारी संचालक श्री. रामेश्वर साखरे व व्यवस्थापक श्री मनोज तायडे यांनी स्विकारला.
संस्थेचे सर्व भागधारक, खातेदार, ठेवीदार यांचे अनमोल सहकार्य व संस्थेचे सर्व संचालक तथा कर्मचारी वृंद अल्पबचत ठेव प्रतिनिधी यांचे परिश्रमाने सलग दुसर्यांदा मॉं जिजाऊ अर्बन च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ समीर पर्हाड यांनी आनंद व्यक्त केला असून ग्राहकांचा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवित मॉं जिजाऊ अर्बन आपली वाटचाल आणखी वेगाने करेल तसेच शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मौजे तांदुळवाडी व मौजे नांद्राकोळी येथे धान्य गोदाम चे बांध काम प्रगती पथावर आहे. संस्थेने मार्च 2024 अखेर एकूण व्यवसाय 230 कोटीचा पूर्ण केला असून संस्थेची कामगिरी अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाची राहिली.



