बातमी

युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन 

युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन 

बुलडाणा 
         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ४ जुलै २०२४ रोजी  शहरातील स्थानिक सैनिकी मंगल कार्यालय येथे मदत केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.
      यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडवे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, सचिन कोठाळे, शुभम मराठे, रोहित गवळी , विजय आसणे, संघपा वानखेडे, पवन बुरुकले,  शुभम शेळके यांच्यासह शिवसेना,  युवा सेनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणावर माता-भगिनी उपस्थित होत्या.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button