बातमी

रक्तदानाच्या महायज्ञाला छत्रपतींच्या भूमीतून प्रारंभ * राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन ; तीन हजार पिशव्यांचे उद्दिष्ट

रक्तदानाच्या महायज्ञाला छत्रपतींच्या भूमीतून प्रारंभ

* राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन ; तीन हजार पिशव्यांचे उद्दिष्ट
बुलढाणा 
       राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाला १ फेब्रुवारी रोजी छत्रपतींच्या भूमीतून म्हणजे सातारा येथून प्रारंभ झाला, तर १३ मार्च रोजी जिजाऊंच्या जिल्ह्यात समारोप होणार आहे. 
 
             राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात १०० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी रोजी सातारा येथून शिबिराला प्रारंभ झाला, तर २ फेब्रुवारी धाड, ३ फेब्रुवारी पहूर, ४ फेब्रुवारी जळगाव जामोद आणि ७ फेब्रुवारीला नाशिक आणि चिखली येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले, तर राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 
एकाचवेळी राज्यात सर्वात जास्त रक्तदान शिबिरे घेण्याच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. शिबिरांमधून संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी रक्तदात्यांकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावेळेस तीन हजार पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
* चिखलीत ६३ पिशव्या रक्त संकलित
          चिखली येथे ७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ६३ पिशव्या रक्त संकलित झाले. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी याप्रसंगी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. यावेळी राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष विजय महाजन, संचालक प्रा.पांडुरंग सवडतकर, दीपक गायकवाड, स्थानिक संचालक राम लोखंडे, शेख सादिक, नंदकिशोर दांडगे, डॉ.संदीप वाघ, जयदीप वायाळ, नंदकिशोर गायकवाड, रमेश काळे, नाना सपकाळ, मदन पऱ्हाड, डॉ.संतोष वानखेडे, डॉ. गौरव महिंद्रे, डॉ.विशाल सावळे, शेषराव परिहार, नंदू पिसे, रोहित खेडेकर, अमर व्यवहारे, सुनील चिंचोले, विद्यानंद कुटे, स्वनिल देवकर, सचिन कुटे आदी उपस्थित होते.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button