बातमी

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे मा.जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते विमोचन.

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे
मा.जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते विमोचन.

बुलढाणा: रस्ता सुरक्षा जागृती अभियान पोष्टरचे विमोचन मा.जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते दिनांक 23/01/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात करण्यात आले. या प्रसंगी मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री सदाशिव शेलार, ‍निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी श्री.समाधान गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्टीय सेवा योजनाचे बुलढाणा ‍जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. हनुमंत भोसले, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पवन जगताप, जिजामाता महाविद्यालय एनसीसी चे लेफ्टनंट प्रा.पवन ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन लोहटे, पंकज लध्दड कॉलेज रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. भरत पवार, प्रा.सुजित पाटील नेहरु युवा केंद्राचे सेवानिवृत्त सहाय्यक धनंजय चाफेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलढाणा व राष्ट्रीय सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी, व्दारा दि. 17/01/2025 ते 23/01/2025 पर्यंत रस्ता सुरक्षा जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशीक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा यांच्या सहकार्याने अयोजित या अभियानात हेलमेट वापरा, सीटबेल्टचा वापर करा, नशाकरुन वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जख्मीना मदत करा, रस्ता सुरक्षा ‍नियम पाळा असा संदेश या पथनाटयामध्यून राष्ट्रीय सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी बुलढाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button