विशेष बातमी

राजर्षी शाहू मल्टिस्टेटने सलग दुसऱ्यांदा बँको पुरस्कारावर कोरले नाव..

लोणावळ्यातील ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये झाला पुरस्कार सोहळा  

अभिमानस्पद…! 

बुलढाणा : आदर्श नेतृत्व
      राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने सलग दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.  लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये ३० जानेवारी रोजी आयोजित समारंभात संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी माजी सहकार आयुक्त दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 
 
        राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासह सामाजिक उपक्रम राबवण्यास राजर्षी शाहू मल्टिस्टेट कटिबद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल व उच्चशिक्षित मनुष्यबळ, प्रशस्त इमारत, कामाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सहकारातील अनेक पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत. तर बँको ब्लू रिबन पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाला. यामुळे संस्थेची मान गौरवाने उंचावली आहे. पुरस्कार सोहळ्याला बँको अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे, ग्लॅलेक्सी इनमा पुणेचे संचालक अशोक नाईक यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, दिग्गज, विविध संस्थांचे वरिष्ठ संचालक मंडळी आदी उपस्थित होते.
 
      सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे व गुणवत्तेबद्दलच्या कटीबद्धतेमुळे “बँको ब्लू रिबन २०२४” हा मानाचा सन्मान आपल्या संस्थेला सलग दुसऱ्यांदा मिळाला. हा प्रतिष्ठित सन्मान आपल्या मेहनतीचे व प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगत संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी कौतुक केले. तर आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळाल्याचा आनंद आहे. संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधी व हितचिंतक यांना हा पुरस्कार समर्पित करते, अशा भावना संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी व्यक्त केल्या.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button