बातमी

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार !* महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केला गौरव

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना बेस्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने ‘सक्षम महिला सक्षम सहकार ‘ अंतर्गत महिला प्रशिक्षण व कार्यशाळा पुरस्कार सोहळा ११ मार्च रोजी आळेफाटा (ता. जुन्नर जि. पुणे) येथे हा कार्यक्रम पार पडला.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनद्वारा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यभरातील सहकारी संस्थांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. अंजली उन्नती फाउंडेशनच्या गौरीताई बेनके, अनुसया महिला पतसंस्थेच्या संस्थापक किरण दिलीपराव वळसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सहकार क्षेत्रातील कार्यरत महिला प्रतिनिधींचा सन्मान तसेच उत्साह वाढवण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यभरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या सर्व सदस्यांचा हा सन्मान असल्याच्या भावना मालतीताई शेळके यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button