बातमी

राजश्री शाहू महाराज जयंती चा स्मारक समितीला पडला विसर….

राजश्री शाहू महाराज स्मारक समितीचे दुर्लक्ष…

शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीदिनी ही शाहू महाराजांचा पुतळा धुळखात…

 

छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती संपूर्ण देशभर मोठा उत्साहात साजरी केली जात असतानाच बुलढाणा शहरामध्ये टिळक नाट्यमंदिर चौकात नगरपरिषदेने उभारलेला राजश्री शाहू महाराज यांचा पुतळा आहे शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे आहे परंतु कुठल्याच पूर्तळ्याचे अनावरण झाल्याने पुतळे झाकून ठेवलेले आहेत परंतु ज्या महापुरुषांची जयंती असते त्यावेळी पुतळा समिती पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करून पुष्प अर्पण करून अभिवादन करतात परंतु राजश्री शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी होत असताना बुलढाणा येथील शाहू महाराज स्मारक समितीला जयंतीचा विसर पडला असल्याचे दिसून आले परंतु शहरातील जागरूक नागरिकांनी समोर येऊन राजश्री शाहू महाराज पुतळा परिसराची स्वच्छता करत पुष्प अर्पण करून अभिवादन केले परंतु पुतळ्यावर आच्छादन असल्याने त्यांना तसेच अभिवादन करावे लागले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर

सम्राट आखाड्याचे संस्थापक आशिषबाबा खरात सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ गजानन ससाणे प्रेम इंगळे सुरेश सरकटे शैलेश खेडेकर वीरेंद्र बोर्डे विनोद गवई संदीप बोर्डे मिलिंद वानखेडे यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button