रामकथा मंडपाचे भुमिपुजन संपन्न… विद्यार्थ्यांनी रामकथा प्रश्नमंजुषेत भाग घ्यावा

रामकथा मंडपाचे भुमिपुजन संपन्न… विद्यार्थ्यांनी रामकथा प्रश्नमंजुषेत भाग घ्यावा- राधेश्याम चांडक
सद्भावना सेवा समिती, बुलडाणा द्वारा दि. ०७ एप्रिल पासुन साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांची रामकथा आयोजित केली आहे. रामकथा मंडपाचे भुमिपुजन विधान परिषद सदस्य धिरज लिंगाडे, सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या शुभहस्ते लहाने ले आऊट, चिंचोले चौक,स.रोड, बुलडाणा दि ३०/०३/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न झाले. रामकथेत नऊ दिवस विविध विषयांवर प्रश्नमंजुषा आयोजित केली यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन राधेश्याम चांडक यांनी केले व पालकांनी आपल्या पाल्यांना कथेत पाठवावे अशी सुचना केली. आमदार घिरज लिंगाडे यांनी रामकथेसाठी शक्यतो सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार संजय गायकवाड यांनी कथेला शुभेच्छा दिल्या, नगराध्यक्षा न.प., बुलडाणा सौ. पुजाताई गायकवाड यांनी नगर परिषद करुन सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. सद्भावना सेवा समितीचे चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टाणी, तिलोकचंद चांडक, सिध्दार्थ शर्मा, उमेश मुंदडा, सुभाष दर्डा सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. पवन बजाज, कन्हैय्या बंग, अमित महाजन, मधुकर गायकी, गिरीधारी शर्मा, तुषार भट्टड, सागर घट्टे, विजय शर्मा, कमलेश चांडक, लाला माधवाणी, समाधानअप्पा पारसरकर, महेश टावरी, अनंता देशपांडे, मनमोहन शर्मा, पंजाबराव इलग, आनंद वर्मा, दिपक वर्मा (मुख्य यजमान), ललित चोपडा, नितीन जैस्वाल, गजु कुळकर्णी, गजानन भराड, अनंता वाघ, देविदास बावस्कर, शिवाजी देशमुख, पुरनमल शर्मा, सौ. आरती शर्मा, सौ. संगीता बाहेती, सौ. प्रेमा राठी, सौ. मनिषा बाहेती, सौ. माया शर्मा, सौ. जमुना शर्मा, सौ. गिता शर्मा, सौ. ज्योती तापडीया, सौ. ॲड. सिमा राजोरीया, सौ. किरण अग्रवाल, सौ. नेहा अग्रवाल, सौ. अंजली परांजपे, सौ. महाजनताई, पंडीत सचिदानंद पुसदकर उपस्थित होते.रामकथेच्या भुमिपुजन प्रसंगी कथा प्रवक्ता सृष्टीलता रामायणीजी यांनी व्हाईस मॅसेज करुन शुभेच्छा पाठविल्या आणि रामकथेमध्ये कोणतीही समस्या येणार नाही कथा निर्वीघ्नपणे पार पडेल अश्या शुभकामना पाठविल्या.



