बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस पदी भास्करराव जाधव यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात जिल्हास्तरावर विविध पदांवर काम करून आपला ठसा उमटवणारे श्री भास्कर जाधव यांच्या कामाची दखल घेत पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी जिल्ह्यातील राजकारणात सुपरिचित असलेले भास्करराव जाधव यांची वर्णे आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सरचिटणीस पदावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका पत्रकाराने करण्यात आली आहे यावेळी भास्करराव जाधव यांना पक्षाचे नेते शरदचंद्र पवार व खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके उपस्थित होते