बातमी

रिपाई आठवलेची उत्तरची जिल्हा बैठक मलकापूर येथे संपन्न

रिपाई आठवलेची उत्तरची जिल्हा बैठक मलकापूर येथे संपन्न

मलकापूर,(प्रतिनिधी)- डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्यापत्रावर चलवित असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकारचे डॅा. रामदासजी आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने मलकापूर येथे 25 फेब्रुवारी 2025 रोजी मलकापूर येथे रिपाई उत्तची जिल्हा बैठक झाली.
नामदार डॅा. रामदास आठवले यांचे जाहीर सभा 7 एप्रिल 2025 रोजी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाची पूर्वतयारी तसेच नाशिक येथे २ मार्च ला जागतीक धम्म परिषदेचे आयोजित केली आहे त्या धम्म परिषदेसाठी कसे जावयाचे याचे नियोजन करण्यासाठी म्हणून पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार होते. सर्व प्रर्थम महामानवाच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
विस टक्के राजकारण व अंसी टक्के धम्म कारण करणारे रिपाईचे दिनदलीतांचे ह्रदय सम्राट रिपाईचे नेते रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालील नाशिक येथील २ मार्चची धम्म परिषद कसी भव्यदिव्य होईल व त्या धम्म परिषदेचे कसे जावयाचे याचेही नियोजन करण्यात आले.
७ एप्रीलची रिपाईची मलकापूर येथील जाहीर सभे संबंधी भाऊसाहेब सरदार जिल्हाध्यक्ष, विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वरजी वाकोडे घाटाखालीलच्या (उत्तर) प्रत्येक तालुखाध्यक्ष यांनी आपआपले विचार मांडले सभा कसी भव्यदिव्य होईल यासाठी रिपाइंच्या प्रत्येक सभासदाने व आठवले यांच्या प्रेम करणारानी तनमनधनाने मदत करावी असे आव्हान सर्वांनी केले.
राष्ट्रगीताने बैठकीची सांगतं झाली.
बैठकी नंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे ते मलकापूर येथील लायब्ररीचे ठिकाणची पाहणी केली करते वेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे, विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे, विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, जिल्हा महीलाध्यक्षा उत्तर रोशनीताई कबीरदास, जिल्हासंपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हा महासचिव पॅंथर नीलकंठदादा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव इंगळे,जिल्हा सचिव विलास गवांदे , जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे, विदर्भ सचिव विजय सपकाळ, संतोष झनके जिल्हा संघटक, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष संतोष वानखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष दिलीप इंगळे, मनोज धमेरिया खामगाव तालुका अध्यक्ष, बाबूलाल इंगळे तालुकाध्यक्ष संग्रामपूर,सुरज शेगोकार तालुका अध्यक्ष शेगाव, जिल्हाउपाध्यक्ष इंजिनियर राजेश सरकटे, अमर तायडे जळगाव जामोद तालुका सचिव, नांदुरा तालुकाध्यक्ष शैलेश वाकडे, जयपाल मोरे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख, युवा जिल्हाध्यक्ष मंगेश मेढे, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश मेढे व इतर बहूसंख्य कार्यकर्ते या बैठकीत हजर होते व त्यांनी मलकापूर येथील जाहीर सभेचे लायब्ररीचे ठिकाणाची पाहनी केली

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button