रूग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवीनारे संभाजीनगर (औरंगाबाद) घाटी रूग्णालयाचे डिन डॅा. शिवाजीराव सुक्रे- पत्रकार बाबासाहेब जाधव

रूग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवीनारे संभाजीनगर (औरंगाबाद) घाटी रूग्णालयाचे डिन डॅा. शिवाजीराव सुक्रे- पत्रकार बाबासाहेब जाधव
बुलडाणा,(प्रतिनिधी)- डॅा.सुक्रे सरांची कार्यकुशलता ऐकून होतो फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे, “रूगणसेवा हीच इश्वर सेवा “ जोपासणारे डॅा. सुक्रे सर म्हणून मी एक डॅाक्टरचा बाप असल्यामुळे बापाचही मन पाझरल व माझीही इच्छा झाली की, सरांना भेटावा व त्यांच्यसी संवाद करावा व मी फोन केला व त्यांनी मला वेळ दिली व मी वेळेवर भेटीस गेलो.
त्यांच्या घाटी रूग्णालय (औरंगाबाद ) संभाजीनगर येथील एक वर्षाचा कार्यककाळ झाला आहे त्या कार्याचा गौरव करावा त्यांच्यासी प्रत्यक्ष संवाद साधला तर त्यांच्यातील कामकरण्याची पद्धत.
विझलो आज जरा मी..हा माझा अंत नाही..पेटेन उद्या नव्याने…हे सामर्थ्य नाशवंत नाही…छाटले जरी पंख माझे…पुन्हा उडेन मी…अडवू शकेल मला…अजून अशी भींत नाही…येतील वादळे, खेटेल तुफान…तरी वाट चालतो…अडथळ्यांना भिवून अडखळणे…माझ्या पावलांना पसंत नाही…
या प्रमाणे वागणारे प्रत्यक्ष कृतीत करून दाखवणारे डॅा.सुक्रे सर संभाजीनगर घाटी रूग्णालयाचा परिसर निटनेटका व स्वच्छ राहावा याकडे बारकाईचे लक्ष, नविन दिशादर्शक फलकाची उभारणी, संपूर्ण परिसरात पथदिव्यांची सोय,पार्किंगची व्यवस्था, रूणसेवेसाठी २४ तास सेवेचे नियोजन, रूगणालयात २४ तास लिफ्टची सोय, आलेल्या रूग्णांची व रूग्णांच्या नातेवाईकांची जातीने विचारपूस करणे त्यांच्या समश्या जाणुन घेणे काही आडचन असल्यास मी माझा नंबर देतो त्या नंबरवर कॅाल करणे वार्डा वार्डात जाऊन रूगणाची व नातेवाईकांची आसतेने चौकसी करणे, कर्मचाऱ्यांसी सुसंवाद साधून लेखी आदेश न देता तोंडी आदेशानेच प्रेमाणे काम करून घेणे, कोणीही भेटण्यासाठी सरांची चेंबर सदा खुली असते.कोणाचाही फोन येवो प्रेमाणे संभाषण करून प्रश्न सोडवीने असे संवेदनशील, समयसुचक, अभ्यासू, कर्तव्यदक्ष, दुरद्दष्टी असणारे डॅा. सुक्रे सर.जातीने विचारपूस करणारे रूगणांच्या व नातेवाईकांच्या इतर समशा घेऊन येणाऱ्यांच्या प्रेमाणे ह्रदयात जाऊन बसनारे सर. डॅा. देव असतो व ते देवपण देवदुत मला घाटीतील परिसरातील वातावरणातून दिसले त्यांचासी बराच वेळ मी दिलखुलास गप्पा मारल्या तर जेथे जेथे त्यांनी कर्तव्य केले तेथील अनुभव व कामकरण्याची पध्दत मला भाराऊन गेली. अंबेजोगाई येथे महामारी कोविडच्या वेळेचे अनुभव सांगितले डॅाक्टरच्या बोलण्यात, वागण्यात कीती ताकद आहे हे त्यांनी सांगीतले. स्वत:च्या प्रकृती पेक्षा सर्वसामान्य रूग्णाच्या आरोग्याची काळजी करणारे देवदुत घाटी रूगणालयाचे डिन डॅा. शिवाजीराव सुक्रे सरांना संभाजीनगर घाटी रूगणालयात एक वर्ष पूर्ण झाल्या बद्दल व त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांचा आदर्श प्रत्येक डॅाक्टरांनी घ्यावा मी एका डॅाक्टचा बाप व सामाजीक कार्यकर्ता म्हणून बुलडाणा जिल्हा रिपाई (आ) जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व मुकुंदवाडी संभाजीनगर (औरंगाबादचे) एपीआय अनिल कंकाळ यांनी त्यांच्या कार्याचा व एक वर्ष घाटी रूगणालयाचा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल त्यांचा पूष्प गुच्छ देऊन,पेढे भरवून स्वागत केले व पूढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



