लोकसभा लढवण्यासाठी 70 वर्षीय मुस्लिम महिलेने आपली दहा वर्षाची पेन्शन रविकांत तुपकर यांना दिली

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले असून बुलढाणा लोकसभेसाठी महायुती महाविकास आघाडी यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने लोकसभेची निवडणूक म्हणजे मोठे खर्चिक बाब असून त्यासाठी विविध घटकातून वर्गणी करून नागरिक तुपकर ना लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी डेरिंगी देत आहे यामध्येच बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथील रजिया बी मोहम्मद दाऊद यांनी देखील त्यांच्या आयुष्याची जमापुंजी असलेली मिळणारी पेन्शन ची मागील दहा वर्षापासून ची रक्कम जवळपास 50 हजार रुपये एवढी रक्कम आज सुरू असलेल्या सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना सुपूर्ती केली यामुळे स्वाभिमानी नेते रविकांत तूपकर यांना सर्व समाज स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे युवा शेतकरी महिला वयोवृद्ध देखील कुठेच कमी नाहीत हे या घटनेतून दिसत आहे.
निश्चितच ही निवडणूक माझी नसून सर्वसामान्यांची आहे व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची ही निवडणूक असल्याचं सांगत लोकसभेच्या या निवडणुकीत ते उतरले आहेत.



