बातमी

वन बुलडाणा मिशनच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी फराळ वाटप!

बुलडाणा: वन बुलडाणा मिशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले. वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या सुचनेनुसार ४० पेक्षा अधिक ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले.

राजर्षी शाहू मल्टीस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते विविध ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. डोंगरशेवली, साकेगाव, राजुर, भोरटेक, शेंबा, दाताळा, रोहिणखेड, पातुर्डा, संग्रामपूर, मैलपेंड, जळगाव जामोद, येरळी, काकनवाडा, धामणगाव बढे, लिहा, खामगाव, मेरा, देऊळगावमही, जानेफळ, उटी, अंजनी, मांडवा यासह विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button