बातमी

वाघजाळ येथील शिंबरे कुटुंबाला मारहाण करून 90 हजारा एवज लंपास

वाघजाळ येथील शिंबरे कुटुंबाला मारहाण करून 90 हजारा एवज लंपास

 दरोड्याने परीसरात खळबळ 

मोताळा
        तालुक्यातील वाघजाळ (टाकळी) येथे चार दरोडेखोरांनी एका कुटुंबाला मारहाण करून 90 हजारांचा एवज लंपास  केला.  या दरम्यान त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत पती, पत्नीसह  मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची घटना 15 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाघजाळसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
         या दरोड्याबाबत  सागर  किसन शिंबरे यांनी बोरखेडी पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विरुध्द अपराध नं.542 नुसार कलम 394, 457, 452, 34 भा.द.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाघजाळ फाट्यापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या वाघजाळ येथे चार दरोडेखोरांनी आजुबाजुच्या परिसरातील दरवाजाच्या कडी-कोंडा लावून नंतर सागर शिंबरे यांच्या घराचे समोरील दरवाजाची कडी लावून घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करीत सागर किसना शिंबरे (वय 37), सोनल सागर शिंबरे (वय 30), सार्थक सागर शिंबरे यांना  मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोनल शिंबरे यांचा हात फॅक्चर झाला तर सागर शिंबरे यांचा पाय फॅक्चर झाला. दरोडेखोरांनी कपाटातील सोन्याचे दागीणे व नगदी 18 हजार रुपये असा 90 हजारांचा एवज लंपास केला.
      घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेवून दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागर शिंबरे व सोनल शिंबरे यांना बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
     खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ, बोराखेडी पोलिस निरीक्षक बळीराम गिते, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी 16 डिसेबरच्या सकाळी 7 वाजता घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
        घटनेची गंभीरता पाहता पोलिस प्रशासनाने डॉग स्कॉट राणीला पाचारण करण्यात आले होते. राणीला घेवून पोहेकाँ.बबन जाधव, हवालदार विलास पवार घेवून आले होते. परंतु चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सोडले नसल्याने राणीला चोरट्याचा माग घेता आला नाही.  दरोड्याचा पुढील तपास सपोनि राजवंत  आठवले हे करीत आहेत.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button