बातमी

विकसित भारत संकल्प यात्रेतून शासकीय योजनांचा जागर*

*विकसित भारत संकल्प यात्रेतून शासकीय योजनांचा जागर*

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आवाहन

बुलडाणा, दि.१६(जिमाका):
देशातील युवाशक्तीला पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना रोजगार देण्याचे काम केल्या जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार विविध शासकीय योजना राबवित आहे. युवक तसेच नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय रोजगार, श्रम, वन, हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज चिखली तालुक्यातील पेठ येथे केले.

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रसिद्धीरथ शासकीय योजनांची जनजागृती करत असून, आज १६ डिसेंबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील पेठ गावात पोचली.
दुपारी ४ वाजता ग्रामीण जनतेला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या एलईडी व्हँनवरून दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे संबोधित केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम, रोजगार, वन, हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती संवाद तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव आमदार श्रीमता श्वेता महाले आमदार अँड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर उपस्थित होते.

यावेळी केंद्राच्या योजनेची माहिती केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी देऊन ग्रामीण भागातील जनतेशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. देशातील अन्नदात्या शेतकऱ्याला सुखी संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि बी-बियाणे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. यातून अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल, असा आशावाद ही केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी व्यक्त केला.

ज्या लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही, अशांना लाभार्थ्यांना तात्काळ मंत्री महोदयांच्या हस्ते योजनांचा देण्यात आला.
केंद्र शासनाच्यावतीने विविध लोकाभिमुख योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे. लक्ष्यीत लाभार्थी या योजनांपासुन वंचित राहु नये, यासाठी केंद्र शासनाने या यात्रेला सुरुवात केली. आजच्या संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
********

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button