बातमी

विजय देशमुख जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत

पत्रकार हल्ला विरोधी सत्यशोधन समितीच्या अध्यक्षपदी वर्णी

*विजय देशमुख जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत*

◾पत्रकार हल्ला विरोधी सत्यशोधन समितीच्या अध्यक्षपदी वर्णी

बुलढाणा, 15 जानेवारी (प्रतिनिधी) ः दैनिक पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी विजय देशमुख बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीशी जुळले असून त्यांना पत्रकार हल्ला विरोधी सत्यशोधन समितीचे नेतृत्व करतील. श्री देशमुख हे जवळपास चार दशकांपासून पत्रकारिता करीत असून सन 1995 मध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणूकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी कौतुकास्पद भूमिका निभावली होती. जिल्ह्यात कुठेही कुणाही पत्रकारावर हल्ला झाला की, त्याबाबतचे सत्यशोधन करून आंदोलनात्मक भूमिका सत्यशोधन समिती घेईल. यासाठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आणि त्याठिकाणचे समन्वयक हे सत्यशोधन समितीमध्ये पदसिद्ध सदस्य असतील. विजय देशमुख यांची पारदर्शक कार्यशैली आणि दांडगा अनुभव पाहता, त्यांच्या रूपाने एक कर्तव्यतत्पर पत्रकार बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाशी जुळला असल्याची भावना, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी व्यक्त केली आहे. सदर नियुक्ती जाहीर करतांना श्री देशमुख यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी रणजीतसिंग राजपूत तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, कार्याध्यक्ष वसीम शेख अन्वर, उपाध्यक्ष संतोष लोखंडे, सरचिटणीस कासिम शेख, विभागीय संघटक रहमत अली आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button