राजकीय बातमी

विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया केल्यानेच महिला जिल्हाध्यक्षांवर निलंबनाची कारवाई….आ मनोज कायंदे

*प्रदेशाध्यक्षांच्या पत्राने पक्षातून केले निलंबित..*

विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया केल्याचा महिला जिल्हाध्यक्षांवर ठपका….

  1. *प्रदेशाध्यक्षांच्या पत्राने पक्षातून केले निलंबित..*

सिंदखेडराजात विधानसभा निवडणुकीदरम्यान आ मनोज कायंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार यांच्याकडून उमेदवारी मिळाली होती तसेच महायुतीकडूनच शिवसेनेचे डॉ शशिकांत खेडेकर देखील मैदानात होते यादरम्यान महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षविरोधी काम केले त्यावेळी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केल होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आ मनोज कायदे यांना मतदारसंघातून येणाऱ्या प्रतिक्रियांना तोड द्यावे लागले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच ही बाबा जिल्हाध्यक्ष नाजीर काजी व आमदार मनोज कायदे व राज्य उपाध्यक्ष टी डी अंभोरे यांनी पक्षश्रेष्ठ कडे दीड महिन्यापूर्वी पत्राद्वारे ही माहिती कळवली  यावर 18/12/24 रोजी कारवाई केली असल्याचे पत्र सध्या वायरल होत आहे.तर काही दिवसां अगोदर महिला जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष नाजीर काजी यांच्यावर आरोप करत एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

निवडणुकीच्या काळात पक्ष विरोधी कारवाई केल्या तसेच त्यांच्या त्या महिला जिल्हाध्यक्षांच्या मूळ गावातून मला फक्त 40 मते मिळाली सोबत असूनही पक्ष विरोधी काम केले अशा तक्रारीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली होती यावर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी महिला जिल्हाध्यक्षांना पक्षातून दिनांक 18/ 12/ 2024 रोजी निलंबित केल्याचे पत्र काढण्यात आलं ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि दिनांक 19/12/ 2024 रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र आता व्हायरल होत आहे. आता त्यात कुठलही तथ्य नसल्याचं आमदार मनोज कायंदे यांनी “आदर्श नेतृत्व” शी बोलताना सांगितले

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button