राजकीय बातमी

विधानसभा मतदारसंघात, कोण ठरणार दमदार ‘आमदार’

विधानसभा मतदारसंघात, कोण ठरणार दमदार ‘आमदार’

बुलडाणा:- राज्यात राजकीय घडामोडीनंतर अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभेत 2019 ची विधानसभा निवडणूक मध्ये आमदार संजय गायकवाड यांना 67,785 मते मिळाली तर माजी आमदार विजयराव शिंदे यांना 41,710 मतं घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर त्यावेळेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना 31,316 मते घेऊन समाधान मानावे लागले तर भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे यांना 29,943 मते पडली होती.

2024 च्या विधानसभा निवडणुकीचे चित्र मात्र वेगळे आहे विद्यमान आमदार संजय गायकवाड मागील वेळी महायुतीकडून धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना पक्षावर लढले होते.
व त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवत 41 हजार मत मिळवली होती.
त्यावेळी राजेंद्र गोडे हे भाजपात असताना बंड पुकारत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी देखील 29 हजार मतं घेतली होती

मात्र 2024 च्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार विराज शिंदे हे भाजपासोब आहेत
आणि याचा फायदा आमदार संजय गायकवाड यांना होईल का..?
का पुन्हा एकदा माजी आमदार विजयराज शिंदे नवीन काही खेळी खेळतात का याकडे देखील मतदारांची लक्ष लागून आहे. कारण आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजय शिंदे यांच्यातील शीत युद्ध हे सर्वजण जाणून आहेत.
भाजपातील माजी आमदार विजयराज शिंदे व राजेंद्र गोडे यांनी आमदार संजय गायकवाड यांची साथ दिली तर या ठिकाणी महायुतीला भेदता येन शक्य नसल्याचे चित्र बघायला मिळते
याउलट महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत आहेत परंतु यांच्यातील अंतर्गत वाद सर्वांना माहितीच आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,
एड जयश्रीताई शेळके हे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून शिवसेना उभाटा गटाकडून इच्छुकांची यादी देखील मोठी आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, डॉ मधुसूदन साळवे, सदानंद माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शारद पवार यांच्या पक्षाकडून सध्या उमेदवारी कोणी मागताना दिसत नाही
बुलढाणा विधानसभेचा 2024 चा आमदार हा महाविकास आघाडी किंवा महायुती यातील कोणाचा उमेदवार निवडून येईल हे ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे
2019 च्या विधानसभे निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अवघ्या दोन दिवसा अगोदर पक्षप्रवेश करून हे निवडणूक लढलेले माजी आमदार विजयराव शिंदे यांनी 41 हजार मते घेतले होते. त्यामुळे हे मत कायम राहिली का आणि विजयराज शिंदे यांचे व आमदार संजय गायकवाड यांच्याशी असलेले मतभेद पाहता विजयरा शिंदे महायुतीत असले तरी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे वळवण्यात ते यशस्वी होतात का ? हे पाहणं देखील तेवढेच महत्त्वाचा असणार आहे.
एकंदरीत बुलढाणा विधानसभा ही पंचरंगी होणार असून यात कोण बाजी मारत हे येणारा काळच ठरवणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर जिल्ह्यात एक नवीन चेहरा समोर आला तो म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लोकसभेत 2 लाख 49 हजार मतं मिळाली होती तर बुलढाणा विधानसभेत त्यांना 50 हजाराहून अधिक मत मिळाली आहेत त्यामुळे त्यांचा देखील उमेदवार किंवा ते स्वतः बुलढाणा विधानसभा लढवू इच्छितात का ? हे देखील पाहणे उत्सुकतेच असणार आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button