बातमी

*”विशाल आराख ह्यांचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सहृदय सत्कार!*”

*”विशाल आराख ह्यांचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सहृदय सत्कार!*”

 

बुलडाणा :- नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा २०२४च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ह्या मध्ये चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथिल विशाल शांताराम आराख ह्याने घवघवीत यश संपादन केले आहे.यांची महसुल सहाय्यक या पदावर नियुक्तीकरण्यात आली आहे.
त्या प्रित्यर्थ विशाल शांताराम आराख यांचा सत्कार आणि गौरव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. ह्या वेळी जेष्ठ नेते अर्जुन बोर्डे, उध्दव आराख, राजु भाऊ जाधव, प्रकाश आण्णा बनकर, प्रकाशजी पचेरवाल, विशाल जाधव,आणि सहकारी मीत्र युवक हजर होते,
हे सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व माझे आई वडील यांच्या मुळेच मि सिद्ध करू शकलो असे भावनिक उद्गगार विशाल शांताराम आराख यांनी केले. यांचा सत्कार शाल व गुच्छ देऊन विशालचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजतील उच्चशिक्षण घेतलेल्या,
शिकलेल्या मुला मुलांनी विशाल याचा आदर्श घेतला पाहिजे. त्याने एका गरीब शेतकरी कुटुंबाचे नाव, समाजाचे नाव उंचावले आहे.विशाल हा शांताराम आराख ह्या शेतकरी घरातील मुलगा आहे, त्यांचे वडील मागील दोनवर्षे वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष होते. घरातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे वातावरण होते त्या मुळे चांगले विचार व मेहनत च्या जिवावर चांगला अभ्यास करून आपले जिवनाचे भले केल आहे. आपण त्याचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. असे मार्गदर्शन आयु.अर्जुन बोर्ड साहेब यांनी केले. आईवडीलांची मेहतिला बळ आलय. विशालने शेतकऱ्याच्या कस्टकार्याच्या लेकाने खरोखरच एक मोठा इतिहास रचला आहे प्राप्त झालेल्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे भावी जीवनाबाद्द शुभेच्छा दिल्या.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button